रसायनी 

शासकीय धान्याची पावती न देणे व कमी प्रमाणात धान्य देणे असे प्रकार रेशन दुकानदार करीत असल्याची तक्रार नानीवली व परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे केली आहे.

खालापूर तालुक्यातील नानिवली येथे शासकीय रास्तभाव धान्य दुकान आहे,येथे नानिवली,बिबे ठाकूरवाडी व नम्राची वाडी आहे,साधारण तीनशे कार्डधारक असून बहुतांश आदिवासी समाज आहे.जानेवारी 2020 ते जून 2020 या दरम्यान वितरित करण्यात आलेल्या धान्यची पावतीच दिली नसल्याचे तक्रारीत म्हटले असून दिलेले धान्य देखील कमी प्रमाणात आहे.जून महिन्यात कार्डवर फक्त तांदुळ देण्यात आला आहे.यावेळीही पावती दिली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी तक्रारी अर्जात केला आहे.अद्यापही निम्म्याहून जास्त कार्डधारक ऑफलाइन आहेत,रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी सर्व कार्डधारक यांनी आपली कागदपत्रे दुकानदार यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत,पुरवठा शाखेत कार्ड ऑनलाइन करण्याची जबाबदारी कुणाची यांच्यावरच खळ जास्त होत असल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे.कोरोना या संसर्गजन्य महामारीच्या काळात केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या धान्यबाबत माहिती मिळत नाही,या भयानक काळात रोजगार नाही,त्यामुळे शासकीय मदतीवरच गोरगरीब अवलंबूनआहे.रेशनदुकानदार याच्या या वागणुकीमुळे उपासमारीची वेळ आली आहे.शासनाने कमी धान्य दिल्यामुळे मी कमी प्रमाणात देत असून तुम्ही शासनाला जाब विचारला पाहिजे असे दुकानदार यांचे म्हणणे आहे,असेही तक्रारदार म्हणतात.शासकीय नियमानुसार धान्य न मिळाल्यास व या प्रकरणी चौकशी न झाल्यास लोकशाहीमार्गाने जाऊन आंदोलन करू असे तक्रारीत म्हटले आहे.

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....