बोर्ली पंचतन 

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली-पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.भारत मगर या कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍याचे गेल्या पाच महिन्यांपासून वेतन येत ारंतानसल्याने त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा प्रश्‍न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे.श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली-पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्राला गेले काही वर्षे रिक्त पदांचे ग्रहण लागले होते.डॉक्टर नसल्याने आरोग्य सेवेचा तुडवडा जाणवत होता.14 जानेवारी 2020 रोजी डॉ.भारत मगर हे एक वर्षाच्या कंत्राटी सेवेसाठी बोर्ली-पंचतन आरोग्य केंद्रात रुजू झाल्याने स्थानिकांना धीर मिळाला.गेले पाच महीने कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर आपला जीव धोक्यात घालुन रुग्णसेवा करुनही या आरोग्य अधिकार्‍याचे गेल्या सहा महिन्यांपासूनचे वेतन काहीही कारण नसताना अडवले आहे.याबाबत डॉ. मगर यांनी कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांचे वेतन काढणार्‍या अलिबाग येथील कार्यालयात विचारणा केली असता तेथील कार्यालयीन अधिकारी शर्मिला पाटील यांच्या कडून कोणत्याही प्रकारची समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती तसेच तुमच्या वेतनाचा फंड येतच नाही असे देखील सांगण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकरी यांच्याजवळ देखील याबाबत विचारणा केली असता त्यांच्या कडून देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या विषयावर टाळाटाळ करण्याचा प्रकार समोर आला.त्यामुळे या आधिकार्‍यावर उपासमारीची वेळ आली असुन मानसीक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.कोरोना महामारीच्या वैश्‍विक संकटात वैद्यकीय आधिकारी कोरोना योध्दा बनुन आपला जीव धोक्यात घालुन आघाडीवर आपले कर्तव्य बजावत असताना त्यांचे वेतन रखडल्याने आपल्या दैंनदीन गरजा कशा पुर्ण करायच्या या विवंचनेत असणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांचे मागील सहा महीन्यांचे वेतन लवकरात लवकर मिळावे यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने लक्ष घालुन यातुन मार्ग काढावा अशी मागणी कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांकडुन होत आहे.

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....