Tuesday, April 13, 2021 | 01:49 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पेण तालुक्यात हातपाटी व्यावसायिक बुडतोय
रायगड
04-Mar-2021 07:33 PM

रायगड

पेण | वार्ताहर

पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सक्शन पंपाद्वारे वाळू उत्खनन होत असल्याचा त्याचा या परिसरातील हातपाटी वाळू व्यावसायिकांना बसलाय.परिणामी त्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी अवैधरित्या वाळू उत्खननावर तातडीने बंदी घालून हातपाटी व्यावसायिकांना आधार द्यावा,अशी मागणी होऊ लागली आहे.सुमारे तीन हजार कुटुंबियांचा उदरनिर्वाह यामुळे संकटात सापडला आहे.

पेण तालुक्यात  दादर, रावे, सोनखार, उर्नोली, आमटेम, निगडे, खारपाळे, कोलेठी, शिहू, बेनसे, मुंढाणी, गांधे, चोळे या परिसरात कित्येक कुटुंब हातपाटी  व्यवसाय करतात.  हा व्यवसाय कायदेशीर करण्यासाठी माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीत विधी मंडळात विशेष लक्ष वेधी प्रश्‍न मांडून तो प्रश्‍न तत्कालीन महसूल मंत्र्याकडून निकाली काढून घेतला होता. जेणे करून हातपाटी व्यावसायिकांना रितसर आपला पारंपारिक व्यवसाय करण्याचा परवाना मिळावा. आणि त्यावेळी तो परवाना मिळवून देखील दिला. आजच्या घडीला पेण तालुक्यात हातपाटी व्यावसायिक आपल्या कुटुंबाचा उर्दनिर्वाह व्हावा म्हणून प्रामाणिकपणे व्यवसाय करतात. परंतु अवैधरित्या सेक्शन पंपाद्वारे वाळू माफिये वाळू उत्खनन करत असल्याने पारंपारीक व्यवसाय करत असताना हातपाटी व्यावसायीकांन वर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे.

हातपाटी व्यवसायिक आपआपल्या गावांशेजारी  खाड्यांमध्ये बुडी मारून वाळू काढत असतात. मात्र  वाळू माफियांनी पेण तालुक्याच्या आजुबाजूच्या खाड्यांमध्ये, नद्यांमध्ये वाळू उत्खननाचा धडाका लावला असून   गावाशेजारील खाड्यांमधील वाळू हे वाळू माफिया सेक्शन द्वारे अवैधरित्या सर्रास उत्खनन करतात. पेण महसूल खात्याने हस्तशेप केल्याने या वाळू माफियांनी  तालुक्यातून सध्यातरी पळ काढलेला आहे. 

जीवावर उदार होऊन उत्खनन

शनिवार,रविवारच्या सुट्टीच्या दिवसांमध्ये मोठया प्रमाणात वाळू उत्खनन झाल्याने हातपाटी वाळू व्यवसायिकांना वाळू उत्खनन करण्यासाठी गावा पासून दूर खोल खाडीत जावे जागत आहे. महत्वाची बाब म्हणजे हे हातपाटी व्यावसायिक भल्या पहाटे खोल पाण्यात बुडी मारून वाळू काढत असतात. 15 ते 20 खोल जाऊन वाळू काढणे म्हणजे जीवावर उदार होणेच असत. 

 कर्ण,त्वचा आजाराचा फैलाव 

या हातपाटी व्यवसायीकांना कानाचे आजार उध्दभवतात,त्वचेचे आजार उध्दभवतात, कित्येक जणांना ऐकायला कमी येत तर काहीच्या कानांतून रक्त सुध्दा येतो. त्वचेवर गांजे उठून खाज देखील येतो. तरी देखील हे व्यावसायिक आपला पारंपारिक  व्यवसाय करत असतात. मात्र सक्शन द्वारे वाळू  उत्खनन झाल्याने अतिखोल पाण्यात जाऊन वाळू काढावी लागत असल्याने व कमी प्रमाणात वाळू मिळत असल्याने जिवाशी खेळून वाळू काढून देखील त्यांना योग्य रोजंदारी मिळत नाही. 

3 हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह

पेण तालुक्यात साधारणता 3000 कुटुंब हातपाटी व्यवसाय करतात. हया हातपाटी व्यवसायामध्ये एका होडी मध्ये पाच ते सहा पुरुष काम करत असतात. आणि या प्रत्येक होडीला एक ब्रास वाळू काढण्याच सरकार कडून परवानगी  आहे. साधारणता पाच पुरूष पाच ते सहा तास काम करतात तेव्हा ते जेमतेम एक ब्रास वाळू काढत असतात. मात्र आज अवैध वाळू उत्खननामुळे कमी प्रमाणात वाळू मिळत असल्याने एक ब्रास वाळू काढण्यासाठी सात ते आठ तास काम करावा लागत आहे. साधारणपणे  दादर गावामध्ये 200, रावे गावामध्ये 60 , सोनखार मध्ये 30, उर्नोली मध्ये 15 , आमटेम मध्ये 60, कोलेठी मध्ये 10,शिहू मध्ये 65, हातपाटी व्यवसाय करणार्‍या होडया आहेत. एक होडी साधारणता एक ब्रास वाळू काढते या एक ब्रास वाळूला 3600 रूपये मिळतात त्या 3600 रूपयां पैकी 700 रूपये रॉयल्टी भरावी लागते. इंधन खर्च 200 ते 300 रू. युनियन साठी 100 रूपये.  इतर खर्च 100 रूपये. एका होडीला दिवसा मागे  2400  एवढे रुपये सुटतात.या होडी वर सहा पुरूष काम करतात. प्रत्येकाला साधारणता दिवसाला मजुरी   400 रू. येवढी मिळते.  साधारणता महिन्यातून 20 ते 22 दिवस हा व्यवसाय चालतो . अतिशय परिश्रम करून एका माणसाला महिन्या चे 8 ते 9 हजार रू.सुटतात. या वरच त्यांच्या कुटुंबाचा उर्दर्निवाह चालतो. मात्र आता वाळूचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. कारण सेक्शन द्वारे अवैध्य रित्या वाळू उत्खनन होत असल्याने हातपाटी वाल्यांना एक ब्रास वाळू काढताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. कधी कधी तर एक ब्रास वाळू ही उपलब्ध होत नाही. 

जेव्हा ही मंडळी पाण्यात उडी मारतात तेव्हा शरीरावर सर्व बाजूनी पाण्याचा प्रेशर येतो त्याचा परिणम फुफुसांनवर होतो त्यामुळे यांना अ‍ॅटक येण्याची शक्यता असते तसेच पाण्यात श्‍वास कोंडून ठेवल्याने त्याचा परिणाम कानावर होउन कानातून रक्त येणे, कमी आवाज येणे या समस्या देखील उद्भवतात तसेच आयुष्य देखील कमी होते. हातपाटी व्यवसायिक हे जीवाशी खेळून आपला व्यवयाय करतात.

 डॉ मनीष वनगे 

 ह्दयरोग तज्ज्ञ

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top