Tuesday, April 13, 2021 | 01:40 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पाटणूस शाळेत सत्कार सोहळा
रायगड
04-Mar-2021 07:36 PM

रायगड

माणगाव | प्रतिनिधी

कुंडलिका विद्यालय पाटणूसमध्ये माजी विद्यार्थी आयोजित गुरुवर्य सत्कार सोहळा व शैक्षणिक साहित्य वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे माजी मुख्याध्यापक चिंतामण शंकर सोनवणे, चिंतामण महिपत दिघे, श्रीपाद हुकूमचंद याज्ञीक व मान्यवर उपस्थित होते.

 निसर्ग चक्रीवादळामुळे कुंडलीका विद्यालय पाटणुस या शाळेचे अतोनात नुकसान झाले होते. शाळेचे संपूर्ण इमारत व इमारतीवरील पत्रे हे उध्वस्त झाले होते. या विद्यालयाला टाटा कंपनी भिरा यांचे मार्फत डागडुजी करून व संपूर्ण पत्रे बसवून देण्यात आले. यानंतर विद्यालयाला रंगरंगोटी शाळेतील शिक्षकांनी करून दिली , परंतु विद्यार्थ्यांना  बसण्यासाठी बेंच कमी होते. विद्यालयाला आपापल्या परीने सहकार्य करण्यासाठी 1988- 89 या बॅचकडे संपर्क करण्यात आला व या बॅचने त्वरित निधी जमा करून खारीचा वाटा म्हणून शाळेप्रति आपलं योगदान दिले आहे. या विद्यार्थ्यांनी उदात्त हेतूने 40 बेंच विद्यालयाला विद्यार्थ्यांसाठी दिले ,त्याच बरोबर चक्रीवादळामुळे सहा वर्गांमधील सर्व फळे फुटलेले होते हे फळे एसएससी बॅच 1993 यांच्याकडून विद्यालयाला  देण्यात आले . माजी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट विवळवेढे जिल्हा पालघर यांच्याकडून 85 डझन लाँग बुक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्या. या सोहळ्याला कुंडलिका शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, माजी विद्यार्थी ,माजी, आजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक आणि विद्यमान मुख्याध्यापक सर्व विद्यार्थी व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top