Tuesday, April 13, 2021 | 01:08 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

शेतकर्‍यांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
रायगड
04-Mar-2021 08:51 PM

रायगड

पेण | प्रतिनिधी

सेझ प्रकल्पासाठी शेतकर्‍यांचा जमिनी संपादित करून सदर जमिनीवर सेझ प्रकल्प उभारला गेला नसल्याने सदर जमिनी शेतकर्‍यांना परत मिळाव्या या मागणीसाठी पेण, उरण, पनवेल तालुक्यातील सेझ प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक विकास संस्थेच्या नेतृत्वाखाली 5 मार्च रोजी धडक मोर्चा आयोजित केला आहे. मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र एक जमीन घोटाळा असल्याच्या आरोप करीत याविरोधात प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संस्थचे कार्याध्यक्ष प्रभाकर मोकाशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस संस्थेचे कार्याध्यक्ष अरुण पाटील, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. डी.पी. म्हात्रे, उपाध्यक्ष कृष्णा वर्तक हे उपस्थित होते. शेतकर्‍यांनी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अलिबाग येथे जमा होण्याचे आवाहन अध्यक्ष अरुण पाटील यांनी केले आहे. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top