Tuesday, April 13, 2021 | 12:58 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पनवेलमध्ये ड्रेनेज सफाई
रायगड
04-Mar-2021 06:59 PM

रायगड

पनवेल । वार्ताहर ।

शहरातील पटेल पार्क परिसरात अनेक नागरी समस्या होत्या. याबाबत येथील रहिवाशांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याशी संपर्क साधताच त्यांनी तातडीने सदर समस्यांचे निकारण केले आहे. पटेल पार्क मधील रिडेवलपमेंटसाठी बंद इमारतीच्या मागच्या बाजूला ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे घाणीचे साम्राज्य तयार झाले होते. डासांचा आणि दुर्गंधीचा त्रास आजूबाजूच्या सोसायट्यांना होऊ लागला होता. नागरिकांनी आपली समस्या नगरसेवक विक्रांत पाटील यांना सांगितली. नागरिकांच्या आरोग्यविषयक धोका लक्षात घेऊन त्वरित महापालिका अधिकार्‍यांना सांगून सफाई करून घेतली व जंतुनाशक पावडर सफाई केलेल्या जागेवर मारून घेतली. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य देणारा नगरसेवक लाभल्या बद्दल प्रभागातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top