अलिबाग :

प्रा डॉ. उदय जोशी यांची राष्ट्रीय सहकारिता विकास निगम (एनसीडीसी)या संस्थेच्या नियामक मंडाळावर केंद्र शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. केंद्रीय कृषि मंत्रालयाने पुढील पांच वर्षांसाठी ही नियुक्ती केली आहे.

या संस्थेवर वर प्रतिनिधित्व करण्याची रायगड जिल्ह्यास या निमित्ताने प्रथमच संधी मिळालेली आहे. या संस्थेतर्फे देशभरातील सहकार संस्थांना यात प्रामुख्याने सहकारी साखर कारखाने, सुत गिरण्या, मच्छीमार संस्था, दुग्धसंघ आदींना दिर्घ मुदतीचा वित्त पुरवठा करण्यात येतो. केंद्रीय कृषि मंत्री या संस्थेचे पदासिद्ध अध्यक्ष असतात. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी यासंस्थेवर कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत असतात. या नियुक्तीब  डॉ उदय जोशी यांचे सहकार क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद