अलिबाग 

निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या सागरगड माची येथील रहिवाशांना बसला. निसर्ग चक्रीवादळानंतर येथील अमेक घरांमध्ये विजेची समस्या भेडसावत आहे. ती दुर करण्यासाठी येथील ग्रामस्थाना सोलर सिस्टीमचे वाटप करण्यात आले.

खंडाळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नासिकेत कावजी यांच्या पुढाकाराने व सीएसए मुंबई मेरिऑफ नाझरीन चर्च अलिबा चे फादर पास्कर यांच्या मार्फत एका घरात तीन बल्ब लागतील अशा सोलर सिस्टीमचे वाटप करण्यात आले.

येथील 79 कुटुंबाना  या सिस्टीमचे वाटप करण्यात आले. फादर पास्कर, खंडाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच रंजना नाईक,  माजी सरपंच नासिकेत कावजी माजी सदस्य रतन नाईक , माजी सदस्य अनिता नाईक ग्रामपंचायत खंडाळे कर्मचारी जयश्री पाटील आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही