Thursday, December 03, 2020 | 12:10 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

साळाव-मुरूड मार्गावर पथदिव्यांची मागणी
रायगड
25-Oct-2020 05:36 PM

रायगड

रेवदंडा 

साळाव ते मुरूड दरम्यानच्या मुख्यः रस्त्यावर अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईटच्या अभावाने अंधार असल्याचे येथून प्रवास करताना दिसते. रस्त्यावरील अंधारामुळे ग्रामस्थांसह मुरूड पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांना रात्रीच्या वेळी प्रवास करणे धोकादायक वाटत आहे. 

साळाव ते मुरूड दरम्यानच्या 32 किमी मध्ये अंतर्गत येणार्‍या गावामध्ये बरेच अंतर असल्याने गावागावातील दरम्यानच्या अंतरामध्ये स्ट्रीट लाईटचा अभाव आढळतो. त्यामुळे साळाव ते मुरूड दरम्यानच्या दोन गावामधील रस्त्यावर अंधाराचे साम्राज्या असते. शिवाय मणसाड अभयारण्य रस्त्यालगत असल्याने रात्रीअपरात्री येथील अंधारमय रस्त्याने  प्रवास करताना मारच धोकादाय वाटते. यारस्त्यामध्ये रात्रीच्या वेळी मोटरसायकल अथवा चारचाकी वाहन बंद पडल्यास अंधारात मोठे प्रश्‍नचिन्ह प्रवाशांकरीता निर्माण होते. 

साळाव ते मुरूड दरम्यानच्या येणार्‍या गावाच्या मुख्यः रस्त्यालगत नाक्यावर ग्रामपंचायतीमार्फत लाईट व्यवस्था असते, तेव्हढाच लाईटचा उजेडाचा आधार रात्रीचे वेळी प्रवास करताना मुख्यः रस्त्यावर मिळतो. बारशीव सोडल्यावर लागणारा चढाव व ते थेट काशिद बीचनजीकच्या उतारावर असलेल्या जंगल परिसरातून अंधारातून एकटयाने प्रवास करताना धोकेदायक वाटते. तसेच साळाव जेएसडब्लू कंपनीची जेटी सोडल्यानंतर ते कोर्लईपर्यंत मधील पेट्रोल पंप वरील लाईट वगळता अंधारच अंधार असतो. कोर्लई ते बोर्ली, पुढे बोर्ली ते बारशीव या मधील दोन कि.मी. च्या अंतरात सुध्दा मुख्यःरस्त्यावर नित्याने अंधार असतो. 

मुरूड तालुका पर्यटनक्षेत्र म्हणून प्रसिध्दीस आहे. पर्यटनास येणारे पर्यटक रात्रीचे वेळीही प्रवास करत असतात. यावेळी पर्यटकांची चारचाकी जा-ये नित्याने सुरू असते. यावेळी रात्रीचे वेळी मक्त वाहनाचा लाईट आधार असतो. दुर्देवाने जर मोटरसायकल व चारचाकी वाहन रात्रीचे समयी या रस्त्यावर बंद पडल्यास मोठी पंचाईत निर्माण होते. मुरूड तालुका पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिध्दीस असल्याने साळाव ते मुरूड मुख्यः रस्त्याच्या दुर्तमा स्ट्रीट लाईटची सोय संबधीतानी करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करत आहेत. 

रेवदंडा-साळाव पुलावरही स्ट्रीट लाईटच्या अभावाने नित्याने अंधार असतो. या पुलावरून रात्रीचे समयी वाहनाची जा-ये सुरू असते, नेहमीच रात्रीचे वेळी सुध्दा वर्दळीचा असलेल्या रेवदंडा-साळाव पुलावर स्ट्रीट लाईट करण्यात यावी अशी मागणी नित्याने केली जाते. परंतू संबधीताच्या दुर्लक्षतेने प्रवासीवर्ग नाराजी व्यक्त करत आहेत.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top