Tuesday, April 13, 2021 | 01:33 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

भाजी खरेदीसाठी ग्राहक थेट बांधावर
रायगड
04-Mar-2021 07:01 PM

रायगड

नेरळ । वार्ताहर । 

कर्जत तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी शेतीकडे पुन्हा आपली पावले वळविली आहेत. त्यातून ग्राहकांना ताजी आणि रासायनिक खतांचा वापर न केलेली आणि आपली जवळच्या शेतात पिकवलेली भाजी मिळत असल्याने ग्राहक आता थेट शेतावर पोहचला आहे. नेरळ जवळील जिते गावातील शरद मारुती जाधव आणि शारदा जाधव हे दाम्पत्य यांनी आपल्या शेतीमध्ये विविध प्रकारची भाजीची शेती केली आहे. 

कर्जत तालुक्यातील नेरळ-कशेळे या भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्यावर उल्हास नदीच्या तीरावर जिते गावातील शेतकरी यांची शेतजमीन आहे. उल्हास नदीचे पाणी शेताजवळ असल्याने पंपाच्या साहाय्याने सहज शेतात येत असल्याने शरद जाधव आणि त्यांची पत्नी यांच्या मदतीने मागील तीन वर्षे भाजीपाला शेतीकडे लक्ष केंद्रित केले होते. त्यांच्या घरी याआधी सुरु असलेला दुग्ध व्यवसाय यातून मिळणारे सेंद्रिय खत हे जाधव दाम्पत्याने आपल्या भाजीपाला शेतीसाठी जैविक खत म्हणून वापरण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी आपल्या शेतातून पिकवलेला माल हा नेरळ अथवा कल्याणच्या बाजारात विक्रीसाठी न नेता भीमाशंकर रस्त्यावर झोपडी बांधून विकण्यास सुरुवात केली. त्यातून रस्त्याने जाणारे ग्राहक हे आपली वाहने थांबवू लागले आणि शरद जाधव यांच्या शेतातील भाजीपाला पिकाची माहिती सर्वांना होऊ लागली. त्यात अत्यंत ताजा भाजीपाला तेथे मिळू लागल्याने ग्राहक आपल्या गरजेनुसार शेतावर येऊन भाजीपाला विकत घेऊ लागले. 

यावर्षी जाधव यांनी आपल्या एक एकर शेतात कडधान्य शेती केली आहे. तर एक एकर शेतात भेंडी, गवार, सिमला मिरची, वांगी, टोमॅटो, सितारा मिरची, लवंगी मिरची, कोबी, फ्लॉवर, गवार, दुधी, कारली, घोसाळे, शिराळे, मका, गाजर, बीट  अशा प्रकारची भाजी पिकवलेली आहे. तर शापू, पालक, मेथी, कोथिम्बिर, मुळा अशा पालेभाज्यांची शेतीही करीत आहेत.

शेतातून भाजी काढा व घेऊन जा

ग्राहक म्हणून आलेले स्थानिक यांना शरद जाधव हे आपल्या शेतात जाऊन भाजीपाला काढता येत असेल तर काढा आणि वजन करून घेऊन जा असे आवाहन करतात. शेतात आणि जमीन पाण्याने ओली असल्याने चिखलात जाऊन भाजीपाला स्वतःच्या हाताने काढण्यासाठी अनेक ग्राहक उत्सुक असल्याचे दिसून येते.

आम्ही पैसे कमवायचे आहेत म्हणून शेती करीत नाहीतर शेतीच्या पिकातून आनंद मिळविण्यासाठी शेती करतो. त्यात भरपूर भाजीपाला आम्ही काढून ठेवत नाही, दररोज वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला काढून ठेवतो आणि त्यामुळे तो ग्राहक न आल्याने शिल्लक देखील राहत नाही. त्याचा फायदा आम्हाला आमच्या शेतातील माल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आमच्यावर येत नाही. 

शरद जाधव, शेतकरी

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top