पाताळगंगा 

 अत्यावश्यक रूग्णसेवेसाठी असलेली 108रूग्णवाहिका सेवा देखील व्हेंटीलेटरवर असून  रूग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंङर नसल्याचे चालकाने सांगितल्यामुळे खाजगी रूग्णवाहिकेसाठी धावपळ करण्याची वेळ रूग्णांच्या नातेवाईकांवर खालापूरात आली.

 कोरोना महामारीचा वाढता प्रभाव सर्वञच दिसत असून खालापूर तालुका देखील त्यातून सुटलेला नाहि.कोरोना रूग्ण सापङल्यानंतर खालापूर,खोपोलीतील नांमाकित रूग्णालये बंद ठेवण्यात आली आहेत.त्यामुळे कोरोना लक्षण असलेल्या तसेच इतर आजारामुळे गंभीर रूग्णाला थेट मुंबई गाठावी लागते.बुधवारी खालापूरातील एका रूग्णाला ताप आणि श्‍वास घेण्यास ञास होत असल्याने खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून पुढे उपचारासाठी नेरूळ येथे न्यायचे होते.रूग्णाची ऑक्सिजन पातळी खालावली  असल्याने ऑक्सीजन सिलेंङरसह सुसज्ज रूग्णवाहिका म्हणून 108 क्रमांकावर मागणी करण्यात आली.

 108क्रमांकाची रूग्णवाहिका खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ऊभी होती.परंतु संबधित यंञणेकङून कॉल आल्याशिवाय रूग्णवाहिका हलविता येणार नाहि असे चालकाने सांगितले.शिवाय रूग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंङर संपल्याचे चालकाने सांगितल्यामुळे रूग्णांचे नातेवाईकांची धावपळ झाली.अखेरिस खोपोलीतून ऑक्सीजन सिलेंङर असलेली खाजगी रूग्णवाहिका मोठ्या मुश्कीलीने भेटली.या धावपळीत दोन तास गेले तरि 108क्रमांकावरून रूग्णाच्या नातेवाईकाना रूग्णवाहिके उपलब्धतेबद्दल काहिच माहिती देण्यात आली नव्हती.कोरोना महामारीत तरि यंञणा सक्षम करून रूग्णाना सेवा मिळणे अपेक्षित असताना आरोग्य यंञणेचा गलथान कारभार उघङ्यावर आला आहे.  रूग्ण बरा होवून आल्यानंतर टाळ्या वाजवणे,फूल देण्यापेक्षा उपचाराची गरज असताना योग्य ती मदत मिळते का याकङे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे,अशी अपेक्षा रूग्णाचे नातेवाईक व्यक्त करीत आहेत.