Thursday, December 03, 2020 | 01:47 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

संगणक टायपिंग शिक्षण संस्था सुरू
रायगड
25-Oct-2020 05:56 PM

रायगड

वाकण

 कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जवळजवळ गेले सात महिने पूर्णपणे बंद असलेल्या रायगड जिल्ह्यातील शासनमान्य कॉम्प्युटर टायपिंग शिक्षण व कौशल्य विकास संस्था सुरू करण्यास अखेरीस प्रशासनाने सात ऑक्टोबर पासून परवानगी दिल्यामुळे संस्थेचे संचालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  याबाबत  आमदार अनिकेत तटकरे यांनी लक्ष घातल्यामुळेच संस्था सुरु झाली असून आ. तटकरे यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले असल्याची माहिती नागोठणे  येथील दत्तकृपा कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिट्यूटचे संचालक नारायण भोईर (गुरुजी ) यांनी दिली. 

  याबाबत अधिक माहिती देताना भोईर गुरुजी यांनी सांगितले की,  जवळजवळ सात महिने संस्था पूर्णपणे बंद असल्यामुळे संस्थाचालकांना खुप मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. तसेच यामुळे पूर्वी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची जुलै महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा अद्याप झालेली नाही त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान झालेले आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेक उद्योगव्यवसाय सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिल्यानंतरही कॉम्पुटर टायपिंग शिक्षण व कौशल्य विकास संस्था सुरू करण्यास प्रशासनाची परवानगी मिळत नव्हती. रायगड जिल्ह्यातील 43 सभासदांचे यामुळे मोठे नुकसान होत होते. हे सर्व पाहता दिनांक 26 सप्टेंबर रोजी रायगड जिल्हा कॉम्प्युटर टायपिंग शिक्षण व कौशल्य विकास संस्थेचे पदाधिका-यांनी   आमदार अनिकेत  तटकरे यांची भेट घेतली होती व त्यांना संस्था सुरू करण्यास प्रशासनाकडून परवानगी मिळावी यासाठी अर्ज केले होता.  त्यांनी लगेचच या प्रश्‍नी जातीने लक्ष घालून निवासी जिल्हाधिकारी यांना संपर्क करुन या संस्था सुरू करण्याच्या दृष्टीने  उचित कार्यवाही करण्यास सांगितले. त्यानंतर 7  ऑक्टोबर रोजी प्रशासनाने या संस्थाचालकांना परवानगी दिली असून कोव्हिड 19 च्या सर्व प्रचलित नियमांचे पालन करून या संस्था आता प्रशिक्षणासाठी सज्ज झाल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यातील काही प्रभागामध्ये संस्था चालू करण्यात आल्या नसतील तर त्यांनी आपल्या संस्था सर्व प्रचलित नियमांचे पालन करून चालू कराव्यात असे आवाहन नागोठणे येथील संस्था चालक नारायण भोईर (गुरुजी ) यांनी केले आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top