अलिबाग  

  रायगड जिल्ह्यात लाचखोरीत अव्वल राहण्याची परंपरा महसुल व पोलिस खात्यांनी कायम ठेवली  आहे. सन 2018 ते 2020 या तीन वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात 24 लाचखोर जाळ्यात अडकले आहेत. हा सर्व सामन्यांचा अनुभव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाचखोरांना जरब बसचिण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. तरीही लाचखोर आणि लाच देणारे असे दोघेही हुशार झाल्याने होणार्‍या कारवाइतही मोठया प्रमाणात घट झाली आहे.

 उत्पन्नापेक्षा अधिक संपती कमविणारे आणि इतर भ्रष्टाचारांच्या प्रकरणातील सरकारी कर्मचारांचाही यात समावेश आहे. शासकीय कार्याल्यात अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे खिसे गरम  केल्याशिवाय कामे मार्गी लागत नाहीत. चालु वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात घट झाली आहे. मात्र, अशा गुन्ह्याच्या शिक्षेत  लक्षणीय वाढ झाल्याचे दिसू लागले आहे.

 जिल्ह्यात लाचखोरीत अव्वल राहण्याची परंपरा महसूल व पोलिस खात्यांनी कायम ठेवली आहे. 2018 ते 2020 या तीन वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात 24 लाचखोर जाळ्यात अडकले आहेत. उत्पन्नापेक्षा अधिक संपती कमविणारे आणि इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील सरकारी कर्मचार्‍याचाही यात समावेश आहे. शासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे खिसे गरम केल्याशिचाय कामे मार्गी लागत नाहीत. हा सर्वसामान्यांचा अनुभव आहे.

 अलिबाग  विभागात  या विभागांत गेल्या तीन वर्षी अलिबाग एसीबीने तब्बल 30 सापळे रचून 24 व्यक्तींना अटक केली आहे. जिल्ह्यत लाचखोरांवर कारवाई करण्यात अलिबाग विभाग आघाडीवर आहे. तसेच, वर्षभरात अलिबाग विभागात क्लास वन व क्लास टू अशा 24 जणांवर लाच घेताना कारवाई करण्यात आली आहे. या सर्व कारवायांचा बारकाईने अभ्यास केला असता लाचखोर अधिकारी-कर्मचारी लाच स्वीकारताना दक्षता घेत असल्याचे समोर आले आहे. लाच घेताना वेगवेगळ्या क्लृप्त्यांचा वापर त्यांच्याकडून केला जात आहे. कोटींमध्ये लाच घेतानाच्या केलेल्या कारवाईत क्लास वन अधिकार्‍यांकडून एजंट लोकांचा वापर केला असल्याचे समोर आले होते.

 लाचखोेरीमुळे कर्मचार्‍यांची होणारी पिळवणूक तसेच शासकीय्, निमशासकीय कामासाठी सामान्यांची पदोपदी होणारी अडवणुक वाढत असल्याने स्वत:च्या फायद्यासाठी सरकारी बाबूंना लाच देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अशा लाचखोरांच्याचिरोधात  धडक कारवाइला सुरुवात केली आहे. अलिबाग विभागात 2018 मध्ये एसीबीने 11 एजंटना अधिकार्‍यांच्या वतीने लाच घेताना पकडले.  2019 मध्ये 10 , 2020 मध्ये 03 तर, एकूण जिल्ह्यात राज्यभरात 24 लाचखोरांना  अटक करण्यात आली आहे.

 याबाबत एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले, की क्लास वन, क्लास टू अधिकारी लाच घेताना सहसा पुढे येत नाहीत. त्यासाठी त्यांच्याकडून एजंट लोकांचा वापर केला जात आहे. हे एजंट लोक अधिकार्‍यांच्या जवळपासचे किंवा खास मर्जीतील असतात. तेच एजंट अधिकार्‍यांच्या वतीने सर्व तडजोड करतात. त्यासाठी अधिकार्‍यांकडून त्यांना टक्केवारी ठरवून दिलेली असते. अधिकारी कोठेही पुढे येणार नाही, याची दक्षता एजंट लोकांकडून घेतली जाते. त्यामुळे अशा अधिकार्‍यांवर कारवाई करण्यास मएसीबीफला अडचणी येतात. तसेच, एजंट आणि अधिकारी यांचे संबंध पुराव्यानिशी दाखवितानाही अडचणी येत आहेत. त्यासाठी एसीबीकडूनदेखील त्यांच्या कामात बदल केला जात आहे. तसेच, कोर्टात टिकतील असे पुरावे गोळा केले जात आहेत. त्यासाठी कायद्याचा आधार घेतला जात आहे.

लाच घेण्यासाठीही एजंट

 लाचखोरीची मोठमोठी प्रकरणे समोर येत असताना लाचखोरांकडून रक्कम स्वीकारण्यासाठी एजंट लोकांचा वापर करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. खास करून वरिष्ठ अधिकार्‍यांकडून लाचखोरीसाठी एजंटचा वापर केला जात असल्याचे तपासात आढळून आल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागापुढील (एसीबी) आव्हाने वाढली आहेत.

लाच घेण्यासाठी अधिकार्‍यांकडून एजंट लोकांचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. अलिबाग एसीबीने 2020 मध्ये जिल्हा तक्रार निवारण लार्यालयात लाच घेताना केलेल्या  कारवाईतही एजंटचा सहभाग होता. एजंट व अधिकारी यांच्यातील संबंध कोर्टात सिद्ध करण्यासाठी एसीबीने कामात बदल केला आहे. तसेच, पहिल्यांदा लाचखोरीच्या गुन्ह्यात कट रचण्याचे (120 बी) कलम लावले आहे.

 - अधिकराव पोळ, पोलिस उपधीक्षक, एसीबी अलिबाग

अवश्य वाचा