Tuesday, April 13, 2021 | 12:16 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

कोरोनाची चिंताजनक वाढ
रायगड
04-Mar-2021 08:48 PM

रायगड

मुंबई | प्रतिनिधी

कोरोनाविरोधात लसीकरण सुरु झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळतेय असे वाटत असतानाच पुन्हा एकदा देशात आणि राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. सातत्याने वाढत जाणारा कोरोनाचा विळखा आणखी धडकी भरवू लागला आहे. बुधवारी राज्यात एकाच दिवशी कोरोनाच्या 9 हजार 855 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 42 जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या गेल्या चार महिन्यामधील सर्वाधिक आहे. 

गेल्या 24 तासांत तर देशात दीड महिन्यातली सर्वाधिक वाढ झाल्याची नोंद केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात तब्बल 17 हजार 407 नवे कोरोनाबाधित सापडले असून, 89 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 कोटी 11 लाख 56 हजार 923 इतका झाला असून, आततापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 57 हजार 435 रुग्ण दगावले आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये सापडलेल्या नव्या कोरोनाबाधितांपैकी 85.51 टक्के बाधित फक्त सहा राज्यांमध्ये सापडले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक बाधित आहेत.

देशात सापडलेल्या नव्या 17 हजार 407 कोरोनाबाधितांपैकी 85.51 टक्के बाधित हे महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटक या सहा राज्यांमध्ये सापडले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 9 हजार 855 कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे या सर्व राज्यांमध्ये कोरोनासंदर्भातले निर्बंध पुन्हा लागू करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने किंवा काही प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. 

दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या राज्यात कोरोनाचे एकूण 21 लाख 79 हजार 185 रुग्ण आहेत. तर बुधवारी राज्यात कोरोनामुळे 42 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं पहायला मिळालंय. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांची संख्या आता 52,280 इतकी झाली. राज्यात आता कोरोनातून बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या ही 20 लाख 43 हजार 349 इतकी झाली आहे. सध्या राज्यात 82,343 कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. बुधवारी मुंबईमध्ये कोरोनाचे 1,121 रुग्ण समोर आले आहेत तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या आता 3,28,742 इतकी झाली आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top