मुंबई 

देशात कोरोनाचा कहर सुरुच असून दरदिवशी सुमारे 25 हजारांच्या आसपासतर राज्यात 4 हजारांच्या जवळपास नवे रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाची अक्षरशाः झोप उडाली आहे. तर मागील 24 तासात देशात कोरोनाने सुमारे 600 जणांचा बळी गेला आहे. तर राज्यात 200 हून अधिक जण कोरोनाने मृत्यूमुखी पडले आहेत.

जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यातही पनवेल तसेच उरण भागात ही संख्या अधिक मोठ्या प्रमाणावर आहे. येथील नागरिकांचा थेट मुंबईशी संपर्क येत असल्याने येथील रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत असल्याचे दिसत आहे.