पाली/बेणसे  

सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत कायम चढउतार होत आहे. सुधागड तालुक्यात मंगळवारी सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर सहा रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अनेकजण कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतत असल्याने सुधागडवासीयांना काहीसा दिलासा मिळत आहे.

सुधागड तालुक्यात आता पर्यंत कोरोनाचे 388 रुग्ण झाले असून कोरोनाचे 339 रुग्ण बरे झाले आहेत. तर तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आणि 27 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावे असे आवाहन केले. 

 

अवश्य वाचा