माणगाव 

 माणगाव तालुक्यात बर्‍याच दिवसांच्या विश्रांतीनंतर गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळित होऊन माणगाव शहरातील काळनदी तुडुंब भरून तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

माणगावात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे.शहरातील काळनदी तुडुंब भरली असून तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे.माणगाव बाजारपेठेत व आसपास सर्वत्र जलमय परिस्थिती दिसत आहे.माणगाव बसस्थानक आवारात पाणीच पाणी झाले असून याठिकाणी शेजारीच राहणारे माणगाव येथील प्रतिष्ठित व्यवसायिक विरेश येरुणकर यांच्या घरामध्ये पाणी गेल्याने त्यांनी नगरपंचायत व एस. टी महामंडळावर ताशेरे ओढत संताप व्यक्त केले आहे.माणगाव नगरपंचायतीने याठिकाणी भरलेली गटारे साफ केली नसल्याने बसस्थानकाच्या आवारातून येणारा पाणी माझ्या घरात शिरला असल्याचे विरेश येरुणकर यांनी सांगितले.माणगाव नगरपंचायत दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यावर घाईमध्ये गटार सफाईची कामे करीत असते.त्यामुळे हे काम चांगल्या प्रकारे होत नसल्याने शहरात एक,दोन दिवस पाऊस लागल्यावर लगेचच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन याचा फटका येथील नागरिकांना व दुकानदारांना बसत आहे.यासाठी ही गटार सफाईची कामे पावसाचे आगमन होण्यापूर्वी किमान एक महिना अगोदर झाले तर हे काम चांगले होऊन  शहरात लगेचच पावसात पूरपरिस्थिती निर्माण नाही असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

 

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही