पाताळगंगा 

पावसाचे अगमन झाले की,सर्वत्र ठिकाणी चैतन्य निर्माण होत असते.कारण पाऊस मनाला खूप आनंद देत असतो.यामूळे पावसाचे अगमन झाले की धरती आपली जुनी कात टाकून नवीन साज चढवित असते. धरती जणू हिरवा शृंगार करुन सजली आहे.काय असा भास अनेकांना जाणवू लागला आहे.

 पावसाचे येणं म्हणजे या धरतीने हिरवा शालू परिधान करण असंच काही असतं म्हणूनंच अनेकांना या सृष्टीची भुरळ पडली जात असते. डोंगराच्या दरी खोर्‍यातून वाहणारे  फेसाळलेले धबधबे मानवी मनाला आनंद देत असताना,पक्ष्यांचे थवे त्यांचा मंजूळ ध्वनी मानवी मनाला सुखद अनुभव देत असतात. सर्वकडे जणू चैतन्य निर्माण झालेले आहे.

 माळरानावर आदिवासी बांधवानी भाजीपाल्यांची लागवड सुरु केली असल्यामुळे माळरान जसे हिरवळ निर्माण झाली आहे.तालुक्यांच्या ठीकानी माळरान हे भाज्या मूळे हिरवे गार झाले आहे.त्याच बरोबर सध्या शेतात ही लागवड सुरु आहे यामूळे सर्वत्र धरती जणू या हिरव्या रंगांची उधळण करीत आहे की काय असा भास अनुभवला मिळत आहे.

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....