Thursday, December 03, 2020 | 01:35 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

भरधाव कंटेनरची वाहनाला धडक
रायगड
25-Oct-2020 05:38 PM

रायगड

पनवेल

पनवेल जवळील पुणे-मुंबई एक्सप्रेस किमी नं.-09/200 कोन गावाच्या हद्दीत कंटेनर ट्रक चालकाने दुसर्‍या वाहनास धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. कंटेनर क्र.- एमएच 46 बीएफ 6866 वरील चालक हा भरधाव वेगाने चालला असताना त्याने चंद्रमोहन सुब्रमण्यम विराचामी (वय-33) यांच्या गाडी क्र.- टीएन 47 एक्यू 8409 यास पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते स्वतः जखमी झाले असून त्यांच्या वाहनाचेसुद्धा नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो.हवा. चिकणे करीत आहेत.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top