पुणे, 

  अर्धा कोयता आणि महिलांची परवड ही एक गंभीर बाब आहे व एक प्रकारची वेठबिगारीच आहे, हे उपस्थितांच्या लक्षात आणून दिले व त्यावर ठोस उपाययोजना करावी,अशी मागणी ज्येष्ठ विचारवंत बाबा आढाव यांनी केली.

 महिला किसान अधिकार मंच (मकाम), जगण्याच्या हक्काचे आंदोलन आणि जन आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने अर्धा कोयता : परवड ऊसतोड कामगार महिलांची  या राज्यव्यापी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जेष्ठ कामगार नेते  बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.

या परिषदेला सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांची विशेष उपस्थिती होती.    स्थलांतरित महिलांचे प्रश्‍न आणि संघटन बांधणी यासारखे प्रमुख विषय देखील मकामच्या वतीने मांडण्यात आले. मुद्दे मांडणी करण्यासाठी मकामच्या वतीने मनीषा तोकले, छाया पडघन, गौतम मोगले  किशोर ढमाले, तृप्ती मालती व काजल जैन,उल्का महाजन,मोहन जाधव,डॉ. डी.एल.कराड ,  सुभाष लोमट,  सीमा कुलकर्णी आणि सुजाता गोठोस्कर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

   विधान परिषदेच्या उपसभापती यांनी  नीलम गोर्‍हे  यांनी ऊसतोड मजूर विशेष करून महिला मजुरीच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकार काय पावले उचलणार या बाबत भाष्य केले. तर सामाजिक न्याय मंत्री  धनंजय मुंडे यांनी ऊसतोड मजुरांना न्याय देण्याच्या दृष्टीने अनेक पावले उचलणार असल्याचे आश्‍वासन दिल.  तसेच ऊसतोड मजूर व वाहतूक कामगारांसाठी महामंडळाचे कामकाज पुढील महिन्याभरात सुरु करणार असल्याचे सांगितले.