मुंबई :

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड केल्याची घटना मंगळवारी उशिरा घडली. या घटनेचे वृत्त कळताच सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे.

मुंबईतील दादर या ठिकाणी हे निवासस्थान आहे. येथील कुंड्या तसेच काचांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेनंतर तातडीने पोलिसांनी धाव घेवून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. दरम्यास सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या घटनेचा निषेध करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी असं आवाहन केलं आहे. तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी

राजगृहाचा अवमान करणार्‍यांची सरकार गय करणार नाही. असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे.