पनवेल -

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिडकोमार्फत रायगडवासियांसाठी अद्यावत कोव्हिड रूग्णालय उभे करून द्यावे अशी मागणी शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

          पनवेलमधील बाधितांची वाढती संख्या पाहून पनवेलमध्ये महापालिकातर्फे शासनाने उभारलेले रुग्णालये कमी पडत आहेत. तसेच बधित प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मोठ्या प्रमाणात डिपॉजिट मागितले जाते. सर्वसामान्य जनतेला पैसे ताबडतोब भरणे शक्य नसते. त्यामुळे बाधितांचा जीव जातो. तरी याबाबत पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी   सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांच्याकडे रुग्णालय स्थापन करण्याबाबत पत्र दिले आहे. तसेच सिडको प्रकल्पग्रस्तांच्यावतीने सिडकोकडे अशा प्रकारची मीटिंगमध्ये मागणी केली आहे. सिडको ही संस्था पनवेल, उरण तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जमिनी घेऊन उभारलेली संस्था आहे. अशाच प्रकारचे सर्व सोयींयुक्त रुग्णालय मुलुंड येथे सिडको बनवत आहे. अशाच प्रकारचे रुग्णालय पनवेलमध्ये व्हावे अशा सूचना कृपया आपण सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.