नवी मुंबई

महाराष्ट्र राज्यमंत्री  प्राजक्त तनपुरे  यांनी  शनिवार दि. 11 जुलै रोजी नवी मुंबई महापालिकेला भेट देऊन नवी मुंबई परिसरातील आरोग्य समस्यांबाबत आढावा घेतला. तसेच कोरोना या रोगाशी लढण्यासाठी नागरिकांसाठी केलेल्या उपाययोजनांबाबत तसेच नवी मुंबईतील विविध समस्यांबाबत  संबंधित अधिकार्‍यांकडून माहिती जाणून घेतली. यासोबत वाशी सिडको ऐक्झीबीशन सेंटर येथिल कोव्हिडसाठी नव्याने उभारलेल्या रूग्णालयाला भेट दिली. तेथिल रुग्णांशी संवाद साधुन त्यांना मार्ग दर्शन केले.  यावेळी नवी मुंबई जिल्हाअध्यक्ष रा.कॉ. पार्टी  अशोक गावडे, नवी मुंबई निरीक्षक प्रशांत  पाटील, माजी नगरसेवक संदिप सुतार व माजी आरोग्य सभापती राजु शिंदे ,राजेश भोर , पालिका अधिकारी उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....