नवी दिल्ली 

उत्तर प्रदेशमधील हाथरस पीडिता अत्याचार प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सांगितले आहे. तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. उत्तरप्रदेशचे गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी त्रिसदस्यीय एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

 उत्तर प्रदेशात हाथरस इथे अमानुष छळ आणि बलात्कार झालेल्या 19 मुलीचा अंत झाला. उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्या मृतदेहावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार करायला लावल्याचा आरोप या मुलीच्या पालकांनी केला आहे. मात्र, या मुलीवर तिच्या नातेवाईकांच्या संमतीनेच अंत्यसंस्कार केल्याचा दावा पोलिसांनी केलाय.

  राहुल- प्रियंका यांची जोरदार टीका

 मध्यरात्री दिल्लीतून मोठ्या संरक्षणात मुलीचा मृतदेह आणि तिचे नातेवाईक सफदरजंग रूग्णालयातून निघाले. मृतदेह उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतला होता. विशेष म्हणजे नातेवाईकांच्या आधी पोलीस मृतदेह घेऊन गावात पोहोचले. त्यानंतर रात्री अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 

अवश्य वाचा