जयपूर 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट या दोघांच्यातील अंतर्गत संघर्ष टिपेला पोहोचला आहे. उपमुख्यमंत्री पायलट पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. तर जयपूरमध्ये रविवारी  सकाळपासून मुख्यमंत्री अशोक गहलोत हे आपल्या निवासस्थानी काँग्रेसचे आमदार आणि मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत दरम्यान काँग्रेसच्या सर्व मंत्री आणि आमदार जेथे असतील तेथून जयपूरला पोहोचावे असे आदेश मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिले आहेत.

कोणत्याही मंत्र्याचा किंवा आमदाराचा फोन लागत नसेल, किंवा बंद असेल तर घाबरू नका, जा आणि त्यांना भेटा. सरकारला वाचवण्याची जबाबदारी सर्वांवर आहे, असे मुख्यमंत्री गहलोत यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतम्हटल्याचे राजस्थानचे परिवहन मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी सांगितले.

मुख्यमंत्री अशोक गहलोत दिल्लीत दाखल झालेल्या आमदारांच्या संपर्कात असल्याचेही प्रतापसिंह खाचरियावास यांनी सांगितले. सचिन पायलट हे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. जर त्यांच्या सोबत आमदार गेले असतील तर त्याचा अर्थ ते सर्व मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या विरोधात आहेत, असा होत नाही. त्यांच्यापैकी अनेकांनी मुख्यमंत्र्यांशी वार्ताही केली आहे. मात्र, भारतीय जनता पक्ष हे सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहे. असे असले तरी मुख्यमंत्री अशोक गहलोत हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवूनच आहेत, असे प्रतापसिंह खाचरियावास यांनी सांगितले.

 भारतीय जनता पक्ष सतत पैसे घेऊन संपर्कात असल्याचा आरोपही खाचरियावास यांनी केला आहे. मात्र भाजपला यश मिळणाना दिसत नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, राजस्थान पोलिसांच्या स्पेशल सेलने काँग्रेस आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना नोटीस पाठवण्यासंदर्भात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी एक ट्विट केले आहे.एसजीओला काँग्रेस आमदारांच्या गटाने भाजप नेत्यांद्वारे खरेदीचा प्रयत्न होत असल्याची तक्रार केली होती. त्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य प्रतोद आणि इतर काही मंत्री, तसेच आमदारांना त्यांच्या वक्तव्यांप्रकरणी नोटीस आलेल्या आहेत. काही प्रसारमाध्यमांद्वारे त्या चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत, असे अशोक गहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....