केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी कोरोनामुक्त झाले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी नितीन गडकरी यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. स्वत: नितीन गडकरी यांनी आज त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन कोरोनामुक्त झाल्याची माहिती दिली आहे.तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या बळावर मी कोरोनामधून पूर्णपणे बरा झालो आहे असे नितीन गडकरी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुझे आप सभी को यह बताते हुए बहुत प्रसन्नता हो रही है कि आप सभी के आशीर्वाद और शुभकामनाओं के बल पर मैं कोरोना से ठीक हो चुका हूं। आपके स्नेह के लिए धन्यवाद।

दोन आठवड्यांपूर्वी नितीन गडकरी यांनी स्वत: ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नितीन गडकरी स्वत:चं विलगीकरणात गेले होते. त्यावेळी त्यांनी  संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन केलं होतं.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त