Tuesday, April 13, 2021 | 12:51 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सलग चार दिवस बँका बंद
04-Mar-2021 09:04 PM

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

मार्च महिन्यात अनेक बँक संघटनांनी सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात दोन दिवस संप पुकारला आहे. हा संप 15 आणि 16 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. संपामुळे बँका सलग चार दिवस बंद राहतील. 15 आणि 16 मार्च रोजी सोमवार आणि मंगळवार आहे. 14 मार्च हा रविवार असेल आणि 13 मार्च हा महिन्याचा दुसरा शनिवार असेल, ज्यामुळे बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत 13 ते 16 मार्चदरम्यान बँका सलग चार दिवस बंद राहतील.

संपाबाबत कॅनरा बँकेने सांगितले की, त्याच्या कारभारावर परिणाम होऊ शकेल. कॅनरा बँकेच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, इंडियन बँक असोसिएशन आयबीएकडून माहिती मिळाली आहे की, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन म्हणजेच यूएफबीयूकडून 15 आणि 16 मार्च रोजी संप पुकारण्यात येत आहे. बँकेच्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करु नये, यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

अखइएअ, अखइजउ, छउइए, अखइजअ, इएऋख, खछइएऋ, खइजउ, छजइथ, छजइज आणि अखछइजऋ या बँक संघटनेकडून संप आयोजित करण्यात आला आहे. 2021 च्या अर्थसंकल्पात सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँक आणि एक विमा कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशात 12 सरकारी बँका आहेत. त्यानंतर त्यांची संख्या 10 वर जाईल. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये दोन बँकांचे खासगीकरण केले जाईल. पुढील आर्थिक वर्षासाठी सरकारने निर्गुंतवणुकीचे आणि खासगीकरणाचे लक्ष्य 1.75 लाख कोटी रुपये ठेवले आहे.

या दिवशीही बँका बंद

11 मार्च ही महाशिवरात्री आहे. 16 मार्चनंतर 21 मार्चला रविवारची सुट्टी असेल. 22 मार्च हा बिहार दिन असून, बँकांना सुट्टी असू शकते. चौथा शनिवार 27 मार्च आणि रविवारी 28 मार्च रोजी आहे. यामुळे सलग दोन दिवस बँका बंद राहतील. 29 मार्च रोजी होळीमुळे बँका बंद राहतील.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top