देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांच्या संख्येत काही अंशी घट पाहायला मिळाली होती. परंतु आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशात 86 हजार 821 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यानंतर देशातील कोरोनाबाधितांची एकून संख्या 63 लाखांच्या पुढे पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंदर्भातील माहिती दिली आहे.

गेल्या चोवीस तासांत देशात 86 हजार 821 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 1 हजार 181 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यानंतर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 63 लाख 12 हजार 585 वर पोहोचली आहे. देशात सध्या 9 लाख 40 हजार 705 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 52 लाख 73 हजार 202 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत करोनामुळे 98 हजार 678 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली.

दरम्यान, देशातील कोरोना चाचण्यांच्या संख्येतही मोठी वाढ करण्यात आली आहे. देशात 30 सप्टेंबर रोजी 14 लाख 23 हजार 052 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत 7 कोटी 56 लाख 19 हजार 781 जणांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त