1 ऑक्टोबर राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस. सर्वप्रथम 1 ऑक्टोबर 1975 साली खपवळरप डेलळशीूं जष इश्रेेव ढीरपीर्षीीळेप रपव र्खााीपेहशरारीेंश्रेसू (इंडियन सोसायटी ऑफ ब्लडस्ट्रासफ्यूजन अँड इम्यूनोहिमॅटोलॉजी)द्वारे व्यक्तीच्या जीवनात रक्ताची आवश्यकता आणि रक्ताचे महत्त्व यासाठी साजरा करण्यात आला. खडइढख (आय.एस बी.टी.आय.)ची स्थापना 22 ऑक्टोबर 1971 साली डॉ. जे.जी ज्वाली आणि श्रीमती के. स्वरुप यांच्या नेतृत्वाखाली झाली.

स्वैच्छिक रक्तदानासाठी आवाहन : देशात तसेच महाराष्ट्रात (कोविड-19) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या काळात सर्वात मोठा फटका रक्तपेढ्यांना झाला आहे. रक्ताचा तुटवडा भासू नये तसेच कोरोनाविषाणूचा  संसर्ग टाळण्यासंबंधी शासनातर्फे देण्यात आलेल्या सगळ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन स्वैच्छिक रक्तदान करण्याचे आवाहन शासनस्तरावरुन करण्यात आले. आपण जर रक्तदान करताना  सोशल डिस्टंसिंगचा, सॅनिटायझर आणि मास्क इ. यांचा योग्य वापर आणि काळजी घेतली, तर रक्तदात्याला कोणताही प्रकारचा धोका नाही, याबाबतीत शासन स्तरावर मा. मुख्यमंत्री, मा. आरोग्यमंत्री यांचे तसेच शासनस्तरावरुन स्वैच्छिक रक्तदानासाठी रक्तदात्यांना जनजागृतीपर आवाहन करण्यात आले होते. तसा जनतेकडून प्रतिसादही मिळाला. या वर्षाचे शासनाचे घोषवाक्य आहे -

ङशींफी वेपरींश लश्रेेव र्ीेंर्श्रीपींरीळश्रू रपव लेपीींळर्लीींश ीें ींहश षळसहीं रसरळपीीं उजठजछअ.

स्वेच्छेने रक्तदान करूया आणि कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हातभार लावू या!

रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी स्वैच्छिक रक्तदान  एक पुण्याचे काम : शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे मनुष्याला अनेक आजारांना सामोरे जावं लागते. एखाद्या अपघातात मनुष्य गंभीर जखमी झाल्यास किंवा गंभीर आजार झाल्यास माणसाच्या शरीरात रक्ताची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण होते. ही कमतरता भरुन काढण्यासाठी मनुष्याला आवश्यक त्या रक्तगटाची गरज भासू लागते. अशा वेळी एका व्यक्तीच्या शरीरातून रक्त काढून दुसर्‍या व्यक्तीच्या शरीरात देण्याने ही कमतरता कमी होऊ शकते. तातडीच्या शस्त्रक्रिया,  थँलेसिमिया, हिमोफिलिया,अँनेमिया यासारख्या रुग्णांना नेहमी रक्ताची गरज असते. रक्त हे कुठल्याही कारखान्यात अथवा प्रयोगशाळेत तयार होत नसून, ते तयार होते तुमच्या-आमच्या मानवी शरीरात. यासाठी सुरक्षित रक्त म्हणून स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे ठरते. रक्ताला कुठल्याही जात, पात, धर्म, पंथ नसतो, असते फक्त माणुसकी! मानवाचे रक्त हे मानवाला चालत असल्याने गरजू रुग्णांसाठी सतत रक्ताची गरज भासत असते. यासाठी आपण स्वैच्छिक रक्तदान करुन त्याचबरोबर समाजाप्रति एक सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदानाचे एक महान पवित्र कार्य आपल्या हातून घडू शकते. यासाठी युवा वर्गाने या राष्ट्रीय कार्यक्रमात स्वतः सहभागी होऊन  स्वैच्छिक रक्तदान मोहिमेत रक्तदान करुन रुग्णांचे प्राण वाचविण्याचे पुण्याचे काम आपल्या हातून घडू शकते.

रक्तदानासाठी रक्तदात्याला कोरोना विषाणू संक्रमणाची भीती :

रक्तदान केल्यामुळे किंवा रक्तसंक्रमणामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होत नाही. जर रक्तदात्याने रक्तदान नाही केले, तर गरजू रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी समस्या निर्माण होईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन म्हणजेच सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर सॅनिटायझर इ. योग्य वापर केल्यास आपल्या मनातील कोरोना या विषाणूची भीती जाऊन आपण निर्भयपणे रक्तदान करु शकता. याबाबतीत शासनाकडून तसेच नँको, राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषद, म.रा.ए.नि.सो. राज्य रक्तसंक्रमण परिषद, रक्तपेढी इ. यांच्या माध्यमातून वेळोवेळी जनजागृती केली जाते.

प्लाझ्मा थेरपी कोविड रुग्णांसाठी वरदान ठरु शकते : कोरोनावर कोणतेही लस अथवा प्रभावी औषध निघालेली नाही. त्यासाठी अंदाजे वर्षभरापेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागणार आहे. प्लाझ्मा थेरपीकडून शास्रज्ञ आणि सरकारच्या मोठ्या अपेक्षा आहे. कोरोनाच्या काळामध्ये रक्तदान तर महत्त्वाचं आहेच; पण त्याचबरोबर प्लाझ्मा थेरपीही महत्त्वाची आहे.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोरोनातून बर्‍या झालेल्या व्यक्तींच्या शरीरातल्या प्लाझ्माचा वापर यामध्ये केला जातो.

या अँटीबॉडीज आपल्या रक्तातल्या प्लाझ्मामध्ये असतात. कोव्हिडमधून बर्‍या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणार्‍या अँटीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणार्‍या एखाद्या व्यक्तीच्या शरीरात सोडल्या तर मग त्या व्यक्तीचं शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीनं प्रतिकार करू शकतात. यासाठी बर्‍या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून प्लाझ्मा गोळा करताना त्याच्या शरीरातून काढलेल्या रक्तातून (अहिशीरीळी) मशीनद्वारे प्लाझ्मा वेगळा केला जातो. भारतासोबतच जगातल्या अनेक देशांमध्ये सध्या प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात येतोय. पण, प्लाझ्मा दान करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचनांच्या अटी घालण्यात आल्या आहेत.

* कोरोना व्हायरसची लागण झालेला हा रुग्ण पूर्णपणे बरा झालेला असावा.

* कोरोनासाठीची टेस्ट निगेटिव्ह आल्याच्या 28 दिवसांनंतर त्याला प्लाझ्मा दान करता येऊ शकतो. आणि त्यासाठी त्याच्या रक्तातल्या हिमोग्लोबिनचे प्रमाण 12.5 ग्रॅम टक्क्यांपेक्षा जास्त असायला पाहिजे.

* प्लाझ्मा दान देणार्‍या व्यक्तीने तीन महिने परदेश दौरा केलेला नसावा.

* त्या व्यक्तीला ताप अथवा श्‍वसनाशी संबंधित विकार असू नये. इ.

रक्तदान करते वेळी

रक्तदात्याचे वय, रक्तदाब, हिमोग्लोबिन, पल्स ऑक्सिमिटर, तापमान आदी चाचण्या करुनच रक्त घेतले जाते. आज 1 ऑक्टोबर राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त स्वैच्छिक रक्तदानाविषयी रक्तदात्यांमध्ये जनजागृती व्हावी, एवढाच उद्देश.

जिल्हा रुग्णालय रक्तपेढी,

अलिबाग-रायगड

9511882578.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त