मोहोपाडा

खालापूर तालुक्यातील डोलवली गावातील दिव्यांग युवक प्रतीक मोहिते याचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जेष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम,माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे,ग्रॅव्‍हीटी फीटनेस क्लब चे मिहीर कुलकर्णी व मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथील एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.ग्रॅव्हिटी फीटनेस क्लबच्यावतीने क्रीडा क्षेत्रातील 21 दिव्यांग व्यक्‍ती दत्तक घेण्यात आले. त्यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.प्रतीक मोहिते हा युवक दिव्यांग असून त्याने शरीर सौष्ठव या क्रीडा प्रकारात करियर करण्याचे ठरवले. त्याने अनेक ठिकाणी होत असलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश संपादन केले आहे.

अवश्य वाचा