बोर्ली मांडला

         साईनाथ पवार यांचा जन्म १९ सप्टेंबर १९८१साली एका सामान्य कुटुंबात झाला वयाच्या दुसऱ्या वर्षी ताप येऊन पोलिओ ने दोन्ही पाय गेले. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड आणि त्यातच आई-वडीलाची साथ मिळाली.इयत्ता १०वी पर्यंतच शिक्षणासाठी आईने रोज उचलून पाठीवर घेऊन शाळेत ने-आण करून शिक्षण केले.१९९५ मध्ये दोन्ही पायांवर मुंबई येथे अखिल भारतीय भौतिक चिकित्सालय हाजीअली येथे शस्त्रक्रिया केल्याने त्यांना स्वत:च्या पायांवर   उभा रहायला लागले. शस्त्रक्रिया करण्या आदी हातावर लहान मुलांच्या सारखे रागात होते. नातेवाईक, शेजारी सारेजण सांगायचे शस्त्रक्रिया केलीस तर मरशील अशी भीती दाखवली परंतु कोणत्याही भिंतीला न घाबरता असे रोज घसरत मरण्यापेक्षा काही होऊदे म्हणून शस्त्रक्रिया केली.

         पुढील पदवी पर्यंत चे शिक्षण घरापासून १० किमी अ़ंतरावर अलिबाग येथे छोटा भाऊ वैजनाथ व मित्र सुरज नारकर व ईरफान लोकरे यांच्या मदतीने पुर्ण केले.अथक परिश्रमाने रायगड जिल्हा परिषद येथे भरती प्रक्रियेत निवड होऊन सेवेत रुजू झाले. सा.प्र.विभाग, बांधकाम विभागत,ग्राम पंचाय त विभागात त्यांनी काम केले आणि आता ते समाज कल्याण विभागचा दिव्यांग कल्याण कक्षात कर्यरत आहेत. स्वतः दिव्यांग असल्याने आपल्याला मिळालेल्या स़ंधीचे सोने केले.जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना एकत्र करून प्रत्येकाला स्वावलंबी बनविण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहे.

         स्वतः ९०टक्के दिव्यांगत्व असतांना 'दिव्यांगत्वावर' मात ॑ करून जिद्दीने दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करीत आहेत.  शासन मान्यता प्राप्त *महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे *राज्य अध्यक्ष* पद , रायगड जिल्हा दिव्यांग संघर्ष समितीचे अध्यक्ष पदभार ते उत्तमरित्या पार पाडीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत *महाराष्ट्र शासनाने सन २०१६ला  जिवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. 

      ९०टक्के दोन्ही पायांनी दिव्यांग असताना दिव्यांगत्वावर मात करून स्कुटर व्हिथ अॉडपशन करून चालवित आहेत. तसेच. फोर व्हिलरमध्ये फेरफार करुन हॅड कंट्रोल यंत्रणा बसविण्यात आले ली फोरव्हिलर गाडी चालवत आहेत. त्याच्या जिद्दीला सलाम ते शरीराने दिव्यांग आहेत  मनाने नाहीत, जिद्द, चिकाटी,अत्मविश्वास हा त्यांच्या नसानसात आहे आणि त्यातूनच ते कोणत्याही संकटाला हसत हसत सामोरे जात आहेत.

अवश्य वाचा