नेरळ,ता.2

                             रुग्णांवर उपचार करताना शक्यतो आपण नेहमी रुग्णाला रक्त दिलेले पाहिले आहे.मात्र हीजामा थेरेपी अशी उपचार पद्धत आहे की त्यामध्ये रुग्णाचे रक्त काढुन रुग्णाला बरे केले जाते.पुरातन काळापासुन अस्तित्वात असलेल्या उपचार पद्धतीला कपींग थेरेपी असे देखील बोलले जाते.हीजामा (कपींग)या थेरेपीने शिरांच्या तसेच नसांच्या दुखन्यावर नैसर्गिक पद्धतीने उपचार केले गेले.या शिबीरावेळी माथेरान मधील 250 हुन अधिक रुग्णांवर डॉ.मत्लुक सिद्दीकी व त्यांच्या पत्नी डॉ.सुमैया सिद्दीकी यांच्यासह मुस्कान पन्हाळकर यांनी उपचार केले. 

                                आज 2 डीसेंबर रोजी माथेरान पर्यटन स्थळावर मुस्लिम समाजाचे अध्यक्ष नासिर शारवान यांच्या मार्गदर्शनाखाली युवा कार्यकर्ते सैफअली मुजावर, सालीम चिपाडे,बासिद शारवान तसेच मैहफुज पन्हाळकर यांच्या पुढाकाराने हीजामा थेरेपी शिबीराचे माथेरानच्या मदरसामध्ये आयोजन करण्यात आले होते.गुडघे दुखी,जुनाट सांधेवात, मनक्याचे सर्व प्रकारचे आजार,मेंदुचे आजार,फीट येणे तसेच शरीरातील अशुद्ध रक्त काढले जाते आशा अनेक आजारांवर गुणकारी असलेली हीजामा उपचार पद्धत आहे. या थेरेपीसाठी औषधांची गरज नसते.पुरातन काळातील या उपचार पद्धतीपासुन आजही अनेक लोक अपरिचित अाहेत.या शिबीराला पुरुषांसह महीला वर्गाचा चांगला प्रतिसाद लाभल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने पुन्हा भव्य प्रमाणात हीजामा थेरेपीचे शिबीर घेण्याचा मानस बोलुन दाखवला आहे.याप्रसंगी माजी नगरसेवक तथा पीस ऑफ इंडीया संस्थेचे जिल्हाध्यक्ष शकील शेख,पीस ऑफ इंडीया संस्थेचे माथेरान शहराध्यक्ष अल्ताफ शेख, नगरसेवक शकील पटेल, नगरसेविका नजमा शारवान, नविन चौधरी, फय्युम कुरेशी, अनिस शेख, बिलाल महाबळे, जिब्राईल मुलानी, अल्ताफ डांगे,जहुर चिपाडे तसेच बहुसंख्य कार्यकर्त्यासह नागरीक उपस्थित होते.

 

अवश्य वाचा