दिनांक २९/११/२०१९ रोजी जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडानिमित्त जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग अलिबाग, ग्रामीण रुग्णालय उरण, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट, ट्रकर्स प्रोजेक्ट उरण व जेएनपीटी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिन व पंधरवडा निमित्ताने जेएनपीटी शाळेतुन प्रभात फेरी काढण्यात आली.

           सदरच्या प्रभात फेरीचे उद्घाटन मा.सजय माने सर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुषमा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.   रॅलीची सुरुवात  HIV/ AIDS विषयी शपथ घेऊन करण्यात आली.  रॅलीमध्ये उपस्थित युवक युवतींनी वचन पाळा, एड्स टाळा, HIV/ AIDS व्यक्तीबाबत सदभाव हवा, भेदभाव नको, स्त्री शक्तीचा एकच नारा,  HIV/ AIDS हद्दपार करा, आता युवकांनी ठरवायचे आहे, आता एड्सला हरवायचे आहे., माझे आरोग्य , माझा अधिकार, नारी शक्ती कारे पुकार  HIV/ AIDS  ला करू हद्दपार, जवा हू, नादान नही, नैतिकता पाळा, एड्स टाळा, एका क्षणाची मजा, आयुष्याची सजा, सुखी संसाराची मात्रा, एचआयव्ही तपासणी करून घे मित्रा अशा विविध घोषवाक्याच्या माध्यमातून जनजागृती केली. या रॅलीमध्ये सेंट मेरी, जे.एन.पी. टी. स्कुल उरण व आय. इ. एस.  जे.एन.पी. टी. स्कुल उरण येथील शिक्षक, विध्यार्थी विद्यार्थिनी वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.  सदरची प्रभात फेरी टाऊनशिप मधील सर्व सेक्टर मध्ये काढण्यात आली. यावेळी महादेव पवार समुपदेशक,स्मिता कोंडे प्रयोगशाळा तंत्रज्ञ , आनंद पाटील उपस्थित होते.

       रॅली संपल्यानंतर स्कुलच्या हॉलमध्ये  श्री. संजय माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग, रायगड यांनी एच.आय.व्ही. म्हणजे काय याची कारणे, लक्षणे, समज गैरसमज याविषयी शास्त्रीय माहिती देऊन  एच.आय.व्ही.चा संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंध हाच एकमेव उपाय असल्याचे सांगण्यात आले. युवा वर्ग हा  एच.आय.व्ही./एड्सच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा घटक असून हा घटक अतिजोखमीचा, अतिउत्साही, जोखीम पत्करणारा व जोशपूर्ण काम करणारा आहे. त्यामुळे त्यांना वेळोवेळी  एच.आय.व्ही./एड्सविषयी माहिती देऊन प्रतिबंधात्मक उपाय योजना वेळीच करणे गरजेचे आहे.  एच.आय.व्ही./एड्स हा आजार पूर्णपणे बरा होईल असे प्रभावी औषध शास्त्रज्ञांना अद्याप सापडलेले नसल्यामुळे सद्यस्थितीत एआरटी हि औषधोपचार प्रणाली  एच.आय.व्ही. संसर्गित असणाऱ्या व्यक्तीला दिली जाते. याकरिता प्रतिबंधात्मक उपायांमध्ये लग्नापूर्वी ब्रम्हचर्य पाळा (लग्नापूर्वी हनुमान बना ) व लग्नानंतर श्रीराम बना हा महत्वाचा संदेश आपल्या व्याख्यानात देण्यात आला.  सदर कार्यक्रमाचे वेळी  एच.आय.व्ही./एड्स या विषयीच्या गाण्यांच्या माध्यमातून श्री. लहू मोकल, कळवे यांनी  जनजागृती केली. 

           दुपारच्या सत्रामध्ये ओ. एन.जी.सी. कंपनी उरण प्लॅन्ट यांच्यामार्फत नरेंद्र असिजा, एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर,  ओ. एन.जी.सी. उरण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी  फोर्स उरण येथील सिक्युरिटी ऑफिसर याना  डॉ. लक्ष्मण जतानी रिलिअन्स हॉस्पिटल मुंबई यांनी  पॉवर पॉईंट प्रेसेंटेशनच्या माध्यमातून एच.आय.व्ही./एड्स विषयी शास्त्रीय माहिती देऊन जनजागृती केली. 

अवश्य वाचा