पंढरपूर 

    हैद्राबाद येथील भगिनी प्रियांका रेड्डी यांच्यावर सामूहिक अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली.या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पंढरपूर च्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.

       निवेदनात म्हटले आहे की त्या भगिनीवर सामुहिक अत्याचार करून त्यांना जिवंत जाळण्यात आले आहे.तरी हा जलदगतीने खटला चालून दोषींवर कारवाई करावी. जेणेकरून अश्या  घटना पुन्हा घडणार नाहीत.यावेळी अभाविप जिल्हा संयोजक प्रणव बाडगंडी ,सह संयोजक श्रद्धा पावले तसेच शुभम बंडगर ,मयुरी देवकते,नेहा औताडे,ज्ञानेश्वरि मारडकर,प्रिया दाईनगडे,कपिल पाटील,धनराज भोसले, सौरभ सावळे, विद्यार्थी विस्तारक विकास खंडागळे आदी उपस्थित होते.

 

अवश्य वाचा