महाड-दि.२ डिसेंबर 

      शारिरीक अपंगत्व असले म्हणुन जीवना मध्ये नैराश्य निर्माण होऊ न देणारे अंसंख्य तरुण आपल्या देशांमध्ये यशाचे शिखर गाठून समाजाला दिशा देण्याचे कार्य करीत आहेंत.कोणी आपला स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करुन यश मिळविले आहे तर कोणी उच्च शिक्षण घेऊन सरकारी नोकरीमध्ये काम करीत आहेंत.जन्माने अपंगत्व असलेल्या या तरुणांनी आजच्या तरुणां समोर आदर्श निर्माण केला आहे.सहजगत्या शक्य नसलेले काम अपंगत्व असलेल्या तरुणांनी आपल्या जीद्दीच्या जोरावर पुर्ण करुन दाखविल्याची अनेक उदाहरणे आहेंत.

    मुजफर अब्दुल माजिद काझी- पासपोर्टची कामे करीत जीवनाची वाटचाल करणारा तरुण मुज्जफर अब्दुल मजिद काझी हा अपंग तरुण महाड आणि पोलादपुर तालुक्याच्या सीमारेषेवर असलेल्या वावे या छोट्याश्या गावामध्ये राहातो.जन्मा पासुन पायाने अपंग असलेला मुजफर आज जीवना मध्ये यशस्वी झालेला दिसुन येतो.थोडे फार शिक्षण घेऊन काठीचा आधार घेत मुजफर आपली सर्व कामे करतो.शिक्षण नसल्याने नोकरी मिळणे अशक्य,त्यांतुन घरचा प्रपंच चालविण्याची त्याच्यावर जबाबदारी असल्याने आर्थिक समस्या कश्या प्रकारे सोडवावी या चिंते मध्ये असताना काय करावे हा त्याचा समोर प्रश्न उभा होता.अखेर एक दिवस महाड शहरांमध्ये येऊन त्याने आपला स्वतत्र व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न केला,आणि त्याला यश देखिल मिळाले.पासपोर्ट आणि अन्य दाखले मिळवुन देण्याचे काम मुजफरने सुरु केले.एखाद्याचा पासपोर्ट काढणे सोपे नसताना त्याने सर्व माहिती मिळवून पासपोर्ट काढून देण्याचे काम त्याने सुरु केले त्याच बरोबर आपल्या ओळखीचा उपयोग करुन सौदी मध्ये तरुणांना नोकरी मिळवुन देण्याचा व्यवसाय देखिल या बरोबर सुरु केला.अपंगत्वावर मात करीत त्याने व्यवसाय सुरु केला,,त्या कामा करीता वांरवार मुंबईच्या पासपोर्ट ऑफिसला भेट देणे परदेशांमध्ये जाणाNया तरुणांच्या अडचणी सोडविणे इत्यादी कामे त्याने सुरु केली.अत्यंत प्रामाणिक पणाने त्याची काम करण्याची पध्दत असल्यामुळे तालुक्यांतुन कामे देखिल त्याच्या कडे भरपुर येऊ लागली.या व्यवसायांतुन त्याला आर्थिक उत्पन्न देखिल चांगले मिळण्यास सुरुवात झाली.आजही मुजफर विक्रम रिक्षाने वावे गावांतुन महाड शहरांमध्ये येतो आणि आपला व्यवसाय नित्य नेमाने करुन आपल्या अपंगत्वावर मात करीत जीवनाची यशस्वी वाटचाल करीत आहे.

            महेंद्र मारुती सोंडकर-जीद्द आणि मेहनत करुन शिक्षण पुर्ण केले शारिरीक अपंग असल्याने शिक्षणामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले परंतु आपले वडिल आणि बहिणीच्या सहकार्याने आपण बारावी पर्यतचे शिक्षण पुर्ण करण्यांत यश मिळविले.आपले शिक्षण पेण मध्ये झाले,चालता येत नसल्याने वडीत आणि बहिण सायकल वरुन शाळेंमध्ये सोडण्यासाठी येत होते,अपंगत्वामुळे जन्मा पासुनच आपल्या शरिराची उंची फार कमी असल्याने अनेक ठिकाणी अडचणी येत होत्या परंतु मित्र आणि नातेवाईकांच्या मदती मुळे कोणतीच अडचण समोर उभी राहीली नाही.आपले अपंगत्व शिक्षणाच्या आड येऊ द्यायचे नाही असा निश्चय करीत महेंद्रने बारावी पर्यतचे शिक्षण पुर्ण केले,दहावी मध्ये असताना पायावर उपचार करण्यांत आल्या नंतर आपण स्वत: शाळेमध्ये जाऊ लागलो.आई आणि वडील बहिण यांच्या मदतीने शिक्षण घेत असताना वडीलांचा मृत्यु झाला.आणि बारावी मध्ये असतानाच आपल्याला शिक्षण सोडावे लागले.संपुर्ण कुटूंबाची जबाबदारी आपल्यावर आली.वडिल सरकारी नोकरीमध्ये होते त्या मुळे त्यांच्या मृत्यु नंतर अनुवंâपा तत्वावर महसुल खात्या मध्ये नोकरी मिळाली.पहिली नेमणुक पोलादपुर मध्ये २००५ मध्ये झाली,आपण उंचीने कमी असल्याने अनेक वेळा काम करीत असताना अडचणी येत होत्या परंतु अन्य सहकार्याच्या मदतीने काम करीत होतो.त्या नंतर २०१२ मध्ये महाड मध्ये नियुक्ती करण्यांत आली.तेव्हा पासुन आज पर्यत महाड मधील महसुल विभागामध्ये काम करीत आहे.या ठिकाणी काम करीत असताना लोकांची सेवा करण्याचे समाधान मिळते.आपली पत्नी पदवीधर आहे परंतु घरांमध्ये दोन लहान मुले असल्याने तीला नोकरीला लावली नाही.आज आपण पुर्ण आंनदी आणि समाधानी असल्याचे सांगताना पुष्कळ मेहनत करीत आज आपल्याला हे दिवस दिसत असल्याचे महेद्र सोडकर यांनी सांगितले.

अवश्य वाचा