पनवेल 

महिला कर्मचारीयोंको बचाओ, जमीर लेंगरेकर को हटाओ, लेंगरेकर हटाओ, पनवेल बचाओ, नहि चलेगी नही चलेगी लेंगरेकरकि दादागिरी नाही चलेगी, नामदेव पिचड हाय हाय, लेंगरेकर हाय हाय, नारी शक्ती भारी, ज्योस्त्ना को ना समजो बेचारी या आशयाचे फलक हातात घेऊन शहरातील छत्रपती शिवाजी चौक, टपाल नाका, मिरची गल्ली पासून पनवेल महानगर पालिका या मार्गाने आज पनवेल महापालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात मोर्चा काढण्यात आला. पनवेल महापालिकेच्या क्षिक्षण विभागावर असताना श्रीमती - उपशिक्षिका ज्योस्त्ना भरडा , शिक्षण विभाग पनवेल महानगरपालिका यांनी जमीर लेंगरेकर , उपायुक्त पनवेल महानगरपालिका यांच्याकडून होणाऱ्या छळाबाबत संबंधित विभागाकडे तक्रार अर्ज सादर केला होता मात्र  संबंधित महिलेने तक्रार अर्ज सादर केल्यानंतर सदर प्रकरण दडपण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे लेंगरेकर यांनी संपूर्ण पनवेल मनपा शिक्षण विभागात दडपशाही व दहशत निर्माण केलेली होती महाराष्ट्र हे राज्य फुले - शाहू - आंबेडकरांच्या विचारांसाठी त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा महिलांप्रती असलेल्या आदर यासाठी ओळखले जाते . असे असतानाही शिक्षणासारख्या राष्ट्र उभारणीच्या व पवित्र क्षेत्रांमध्ये लेंगरेकर सारखे वर्ग १ अधिकारी यांचे महिलांप्रतीचा दृष्टिकोन वर्तन लांच्छनास्पद असल्याचे देखील काम करीत असणाऱ्या महिलांनी सांगितले आहे. यामुळे  लेंगरेकर यांची तात्काळ इतरत्र बदली करण्यास शिफारस करण्यात यावी व त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी . २) पनवेल महानगरपालिका सोडून पनवेल परिसरातील शासकिय कार्यालयातील वर्ग १ असलेल्या महिला अधिकारी यांचा समावेश विशाखा समितीत करून ज्या महिलांचे शोषण झाले आहे त्यांची चौकशी करावी . तेव्हा पर्यंत लेंगरेकर व पिचड यांना सक्तिच्या रजेवर पाठवावे या मागण्या घेऊन आज पनवेल महापालिकेवर मोर्चा धडकला. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्च्याची सुरुवात झाली. महिला कर्मचारीयोंको बचाओ, जमीर लेंगरेकर को हटाओ, लेंगरेकर हटाओ, पनवेल बचाओ, नहि चलेगी नही चलेगी लेंगरेकरकि दादागिरी नाही चलेगी, नामदेव पिचड हाय हाय, लेंगरेकर हाय हाय, नारी शक्ती भारी, ज्योस्त्ना को ना समजो बेचारी या आशयाचे फलक हातात घेऊन शहरातील छत्रपती शिवाजी चौक, टपाल नाका, मिरची गल्ली पासून पनवेल महानगर पालिका या मार्गाने मोर्चा काढण्यात आला. यावेळी घोषणा देखील देण्यात आल्या. त्यानंतर पनवेल महानगर पालिका कार्यालाखाली मोर्चा थांबून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची व पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्ष, सामाजिक संस्थची भाषणे झाली यावेळी नुकत्याच झालेल्या तेलंगणा येथील प्रियांका रेड्डी यांच्या झालेल्या प्रकाराबाबत निषेध व्यक्त करून श्रद्धांजली देण्यात आली. पनवेल महानगर पालिकेने दिनांक २९ नोव्हेंबर रोजी महिला तक्रार निवारण समिती / विशाखा समिती पुनर्गठित केली असून यामध्ये वर्ग १ दर्जाच्या महिला अधिकारी यांची नियुक्ती केली असल्याचे पत्र दिले आहे. मात्र इतक्या दिवस न्यायाची भीक मागणाऱ्या भरडा यांच्या या मागणीला न्याय दिला जात नव्हता मात्र आता मोर्चा काढण्याच्या आधी सर्व सूत्रे कमला लावून नोटीस काढून मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला गेला असे भरडा याणी यावेळी बोलताना सांगितले तसेच लेंगरेकर व पिचड यांना जो पर्यंत निकाल लागत नाही तो पर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवावे अशी मागणी त्यांनी केली आहे. यानंतर शिष्टमंडळाने उपायुक्त संजय शिंदे यांची भेट घेतली असता श्रीमती भरडा यांच्या अर्जानुसार आम्ही विशाखा समितीमध्ये बदल केला असून त्यात चौकशी होईल व त्यांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला, मात्र आयुक्तांनी तात्काळ लेंगरेकर व पिचड यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे अन्यथा मी पनवेल ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढेल असा इशाराही श्रीमती ज्योस्त्ना भरडा यांनी दिला आहे पनवेल महानगर पालिका आयुक्तांनी याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी उद्या पुन्हा ११ वाजता शिष्टमंडळाला बोलावले असल्याची माहिती संघटनेतर्फे दिली आहे त्यानंतर पुढचा पर्याय निवडू असे संघटनेतर्फे सांगण्यात आले. या मोर्च्याला शेतकरी कामगार पक्ष, पनवेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजे प्रतिष्ठान यांनी पाठिंबा जाहीर केला होता.

अवश्य वाचा