मोहोपाडा

रसायनी येथील देवलोली गावात राहणारी जान्हवी जयदास पाटील हिने तायक्वांदो स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकाविला आहे.टायगर तायक्वांदो अॅकडमी यांच्यावतीने रायगड व मुंबईसाठी तायक्वांदो चॅम्पियन्स शिप स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेंत १७ वर्षांखालील ६४ ते ६८ वजनाखालील गटात जान्हवी जयदास पाटील हिने व्दितिय क्रमांक पटकावून रोपवे(सिल्व्हर) पदक पटकाविले.जान्हवीला तिचे प्रशिक्षक सचिन माली यांच्या कडून मार्गदर्शन मिळत आहे.या स्पर्धेसाठी रसायनी तून ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.जान्हवीने तायक्वांदोच्या शालेय जिल्हा क्रीडा स्पर्धेंतही व्दितीय क्रमांक पटकाविला होता.तिच्या यशाबद्दल जान्हवीचे सर्वंत्र कौतुक होत आहे.

 

अवश्य वाचा