जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडानिमित्त आयोजित रॅली चे उदघाटन डॉ.अजित गवळी, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड अलिबाग, संदीप वीरभद्र स्वामी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग, ला अंकित बंगेरा, अध्यक्ष लायन्स क्लब श्रीबाग व ला. चित्रलेखा पाटील, ला. निहा राऊत  लायन्स क्लब श्रीबाग , श्री. संजय माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. समाज कोणत्याही क्षेत्रात बदल घडवू शकतो या म्हणीनुसार लोक सहभागातून एड्स निर्मूलन हा एक सामाजिक कार्याचा भाग असून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन एड्स विरोधी लढा तीव्र केल्यास हा आजार व एचआयव्ही विषाणू हद्दपार होईल असे मनोगत  जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड अलिबाग यांनी व्यक्त केले. 

       या रॅलीच्या सुरुवातीला मा. तुकाराम मुंडे (भा.प्र.से), प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार  जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग यांच्यामार्फत आयोजित सेल्फी पॉईन्टचे उदघाटन वरील मान्यवरांच्या उपस्तितीमध्ये करण्यात आले. 

      रॅलीची सुरुवात  जिल्हा सामान्य रुग्णालयतील प्रांगणामध्ये होऊन सदरची रॅली एस.टी. स्टॅन्ड, शिवाजी पुतळा, बालाजी नाका या मार्गे पुन्हा  जिल्हा सामान्य रुग्णालय  येथपर्यंत घेण्यात आली. रॅली मध्ये उपस्थित युवक युवतींनी तसेच लायन्स क्लब श्रीबाग यांच्या सर्व सदस्यांनी वचन पाळा, एड्स टाळा, HIV/ AIDS व्यक्तीबाबत सदभाव हवा, भेदभाव नको, स्त्री शक्तीचा एकच नारा,  HIV/ AIDS हद्दपार करा, आता युवकांनी ठरवायचे आहे, आता एड्सला हरवायचे आहे., माझे आरोग्य , माझा अधिकार, नरी शक्ती कारे पुकार  HIV/ AIDS  ला करू हद्दपार, जवा हू, नादान नही, नैतिकता पाळा, एड्स टाळा, एका क्षणाची मजा, आयुष्याची सजा, सुखी संसाराची मात्रा, एचआयव्ही तपासणी करून घे मित्रा अशा विविध घोषवाक्याच्या माध्यमातून जनजागृती केली. या रॅलीमध्ये नर्सिंग स्कुल,  जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, जे.एस.एम. कॉलेज अलिबाग, पी.एन.पी. कॉलेज वेश्वी अलिबाग तसेच लायन्स क्लब श्रीबाग यांचे सर्व अधिकारी व पदाधिकारी ला. गिरीश म्हात्रे, ला. गौरी म्हात्रे, ला. हर्षद घरत, ला. नेहा घरत, ला. संतोष साखरे, ला. बाबासाहेब चौगुले, ला. कला पाटील, ला. वैशाली बंगेरा, ला.डॉ. स्मिता पाटील, डॉ. दिपक गोसावी, रक्तसंक्रमण अधिकारी, डॉ. पांडुरंग शिंदे, वरिष्ठ वैधकीय अधिकारी, डॉ. नालंदा पवनारकर, वैद्यकीय अधिकारी एआरटी अलिबाग, डॉ.  सुरेश  देवकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी, श्रीम. मोरे मॅडम, प्राचार्या नर्सिंग प्रशिक्षण केंद्र अलिबाग, श्री. नवनाथ लबडे, जिल्हा पर्यवेक्षक, श्री. रवींद्र कदम, जिल्हा सहाय्यक लेखा, सौ. रश्मी सुंकले  जिल्हा सहाय्यक एम.अँड इ., श्रीम. संपदा मळेकर,   जिल्हा सहाय्यक कार्यक्रम, श्रीम. अर्चना जाधव, श्रीम. कल्पना गाडे, श्री. अनिल खंडाळे, समुपदेशक, सौ. सुजाता तुळपुळे, अमित सोनवणे, गणेश सुतार, हेमकांत सोनार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ वाहनचालक महेश घाडगे, किरण पाटील, क्लिनर रुपेश पाटील, संकेत घरत यांनी सदरची रॅली यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पोलीस निरीक्षक अलिबाग यांचेमार्फत नियुक्त पोलीस कर्मचारी यांनी आवश्यक ते सहकार्य केले. तसेच  जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील एआरटी केंद्र, रक्तपेढी, आयसीटीसी, एसटीआय/आरटीआय विभागातील अधिकारी व कर्मचारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सदर रॅलीकरिता उपस्थित असणाऱ्या अधिकारी कर्मचारी तसेच महाविद्यालयातील युवक युवतींना लायन्स क्लब श्रीबाग व ला. चित्रलेखा पाटील यांच्यामार्फत अल्पोपहार व बिसलरी पाणी पुरवठा करून सामाजिक बांधिलकीतून  एआरटी केंद्र अलिबाग येथे उपचाराकरिता आलेल्या एचआयव्ही संसर्गित व्यक्तींना सुद्धा अल्पोपहार व बिसलरी पाणी पुरवठा करून विशेष सहकार्य केले.

     सदरची रॅलीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  डॉ. दिपक गोसावी, रक्तसंक्रमण अधिकारी, रक्तपेढी, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग   यांनी केले. 

अवश्य वाचा