दिनांक २-१२-२०१९

मुरुड जंजिरा - रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन व म्हसळा हे दोन तालुक्यमध्ये अल्पसंख्याक समाज बहुसंख्येने राहत आहे.अल्पसंख्याक समाजाला लागणाऱ्या मूलभूत गरजा व विकासातमक परिवर्तन होण्यासाठी केंद्रात प्रवेश करताच सर्वात प्रथम या दोन तालुक्यांचा केंद्रातील यादीमध्ये नोंद केल्याने आता या तालुक्यांच्या विकासाठी मोठा निधी उपलब्ध होणार असून भविष्यात या तालुक्यांचा विकास झालेला पहावयास मिळणार आहे.लोकांच्या आशीर्वादामुळे मी खासदार म्हणून निवडून आलो त्यांतरची जबाबदारी हि माझी आहे.लोकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन रायगड लोकसभाचे खासदार सुनील तटकरे यांनी मुरुड  येथे बोलताना व्यक्त केले आहे.

     रायगड जिल्हा मुस्लिम उत्कर्ष मंडळास २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी त्यांच्या हस्ते काही मान्यवरांचा सत्कार ठेवण्यात आला होता.यावेळी तटकरे बोलत होते.

      यावेळी व्यासपीठावर फलाही तंजीमचे अध्यक्ष मुस्तफा पौंजेकर,बशीर हजवानी,मोहमद सलीम कलसेकर,मोहंमद मुल्ला,मुफती पुरकर,डॉक्टर सनाउल्ला घरटकर,हसन चोगले,मोहमद बुखारी,अली शम्सी,जाफरखान देशमुख,ए रहेमान हाजीते,राशीद फहीम,उपाध्यक्ष अतिक खोत,मुरुड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील,अंजुमन संस्थेचे अध्यक्ष इरफान शहा,सचिव हिफाजूरहेमान नाझीरी ,सहसचिव अब्दुलरहीम कबले,इरफान हाल्डे, आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी सुनील तटकरे आपल्या भाषणात म्हणाले कि, सुमारे ११० वर्ष अस्तितीव टिकून असलेल्या अंजुमन संस्थेस मी राज्याचा अर्थमंत्री असतांना ५० लाखाचा निधी देण्यात यशस्वी ठरलो होतो.आज या संस्थेस प्रदेशात असलेल्या व्यक्तींकडून सुद्धा मदतीचा हात मिळत आहे याचे आनंद होत आहे.

रायगड जिल्हा मुस्लिम उत्कर्ष मंडळाची नागोठणे येथे मध्यवर्ती कार्यालयाचे बांधकाम सुरु होत आहे या कार्यालय बांधणीसाठी मोठा हातभार लावण्याचे आश्वासन यावेळी तटकरे यांनी दिले.राज्यात शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षाचे सरकार स्थापित झाले आहे हे सरकार पाच वर्ष चालणार कोणीही शंका घेऊ नये.स्थापन झालेल्या सरकारकडून धर्मनिरपेक्षतेचे काम होणार आहे.सर्वाना समान न्याय व विकास कामांना गती देण्याचे काम भविष्यात होईल असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.यावेळी रायगड जिल्हा मुस्लिम उत्कर्ष मंडळाचे उपाध्यक्ष अतिक खोत यांनी आपल्या प्रास्ताविकात भाषणात सांगितले कि, उत्कर्ष मंडळातर्फे शैक्षणिक व आरोग्य सेवेसाठी मोलाचे मोलाचे काम केले जात आहे.समाजातील लोकांनी आम्हाला आर्थिक स्वरूपात मदत केल्यास या संस्थेचे काम मोठ्या प्रमाणात होऊ शकते.लवकरच संस्थेच्या नवीन इमारतीचे बांधकामास सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

      सदरील कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योगपती डॉक्टर सनाउल्ला घरटकर याना विशेष सामाजिक कार्याबद्दल प्रशस्ती पत्रक व ट्रॉफी देऊन तटकरे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

बशीर हजवानी याना नाज ए कोकण,मोहमद सलीम कालसेकर याना फकरे कोकण,मोहमद सईद मुल्ला याना शान ए कोकण,मुफती रफिक पुरकर याना रहेबरे कोकण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सदरील कारयुकर्मास मोठी गर्दी होती.

 

अवश्य वाचा