अलिबाग 

   नोकरी लावण्याचे अमिष दाखवून 32 जणांकडून 99 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. या गुन्ह्यातील दोन मुख्य आरोपींना पकडण्यास अलिबाग पोलीसांना यश आले आहे. इतर नऊ आरोपी फरार आहेत.जनार्दन म्हात्रे, नुतन जुईकर असे या मुख्य आरोपींची नावे आहेत. ओएनजीसी,  शिपींग, मजगाव डाँक, वडाळा हायस्कूल, नेव्ही अशा  अनेक ठिकाणीनोकरीला लावतो असे अमिष 32 बेरोजागार तरुणांना  दाखविले होते. त्यांच्याकडून 50 हजारपासून तीन लाखांपर्यंत अशी एकूण 99 लाख रुपये घेतले होते.

   मात्र त्यांनी या तरुणांना नोकरीला लावली नाही, तसेच नियुक्ती पत्रही दिले नाही. त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणांनी अलिबाग पोलीस ठाणे गाठले. 30 सप्टेंबर रोजी अकरा जणांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे, सहाय्यक फैाजदार अनिल सानप, पोलीस नाईक अक्षय जाधव या पथकाने तपास सुरु केला. तपासात जनार्दन म्हात्रे व नुतन जुईकर  यांना शुक्रवारी सायंकाळी अलिबागमधून अटक केली. 

अवश्य वाचा