नेरळ
सन् 1942 च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांना सळो की पळो करुन सोडणारे आजायांद दस्ता या क्रांतीकारी चळवळीचे प्रणेते माथेरानचे सुपुत्र वीर अण्णासाहेब उर्फ भाई कोतवाल आणि त्यांचे सहकारी वीर हीराजी पाटील नी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगीरीतुन मुक्त करताना ब्रिटीशांशी लढताना वीर मरण पत्करले. या रक्तरंजीत लढ्यातील वीर हुतात्मा भाई कोतवाल यांची 107 वी जयंती मोठ्या उत्साहात माथेरान मध्ये संपन्न झाली. माथेरानचे सुपुत्र वीर भाई कोतवाल यांना अभिवादन करण्यासाठी समस्त माथेरानकरांनी हुतात्मा स्मारक येथुन सकाळी शहरातुन मशाल फेरी काढली होती. त्यांच्या जन्म स्थळी त्यांच्या प्रतिमेस तसेच माधवजी उद्यान येथील अर्ध पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
यावेळी हुतात्मा स्मारक येथे वीर भाई कोतवालांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मुख्य कार्यक्रमाची सुरवात करताना माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते क्रांती ज्योत प्रज्वलनासह मशाल फेरी काढण्यात आली.तर हुतात्म्यांच्या नामफलकास कोतवालांचे पुतणे गणेश कोतवाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन कोतवालांच्या निवासस्थानी स्वतंत्रसैनिक धोंडु पवार यांच्या पत्नी सुशिला पवार यांचे हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर माधवजी उद्यानातील कोतवालांच्या अर्ध पुतळ्यास नगरसेवक नरेश काळे तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या स्तंभास नगरसेविका कीर्ती मोरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्यास उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी वीर भाई कोतवाल नगरपरीषद प्राथमिक विद्या मंदीर तसेच प्राचार्य शांताराम गव्हाणकर विद्या मंदीरच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीत समर गीत तसेच कोतवालांच्या जीवनावरील गीतांनी सुरमयी आदरांजली वाहीली.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अजय सावंत,मनोज खेडकर, रायगड जिल्हा नाभिक संघटनेचे सुदाम शिंदे, दिलीप शिंदे, रघुनाथ विभार, विशाल कोकरे, बिपीन राऊत, सागर मंडलीक,महीला कार्यकरणी रजनी विभार, शोभा कोरडे, अंजली शिंदे , संगिता शिंदे, कोतवाल ब्रिगेड अध्यक्ष रोहीदास क्षिरसागर, स्वाभिमानचे सागर पाटील तसेच नगरसेवक नगरसेविका आणि बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.
Copyright © 2019 कृषीवल. Maintained By Initialize Group