मुरुड जंजिरा       

   सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर व पदमदुर्ग किल्यावर तरंगती जेट्टी व्हावी यासाठी मी व्यक्तिशः प्रयत्न करणारा असून दिल्लीत गेल्यावर भारतीय पुरातत्व खात्याकडे या किल्ल्यावर जेट्टी होण्यासाठी नाहरकत दाखला मिळवण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रायगड लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.रायगडचे खासदार सुनील तटकरे हे एका शैक्षणिक कार्यक्रमासाठी मुरुड येथे आले असताना स्थानिक पत्रकारांनी त्यांना याबाबत परिस्थती अवगत करून दिली असता वरील;प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. यावेळी स्थानिक पत्रकारांनी खासदार सुनील तटकरे याना सांगितले कि, या दोन्ही किल्यावर तरंगती जेट्टी होण्यासाठी महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडून आठ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

   परंतु आजतागात दीड वर्ष होऊन सुद्धा पुरातत्व खाते दिल्ली येथून या प्रस्तावासाठी नाहरकत दाखला न दिल्यामुळे सदरचे काम पूर्ण होऊ शकले नाही.किंवा त्या कामास सुरुवात सुद्धा झाली नाही.त्यामुळे हजारो पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून भरतीच्या वेळी पर्यटकांचे अपघात होऊन पर्यटक गंभीर जखमी होत असल्याचे अवगत करून देण्यात आले.यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकारांना आश्वासित केले कि,दिल्लीत गेल्यावर सदरच्या कामाला गती मिळवून देऊ त्याच प्रमाणे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.यावेळी त्यांनी पत्रकरांशी वार्तालाप करताना सांगितले कि, संपूर्ण देशाचे लक्ष्य महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागले होते.परंतु आदरणीय शरद पवारांनी धुरा संभाळताच शिवसेना राष्ट्रवादी,काँग्रेस मिळून सरकार बनवल्याने राजकारणाला एक नवीन दिशा मिळाली आहे.

   तयार झालेले हे सरकार निश्चितच पाच वर्ष टिकेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.राज्यामध्ये जरी शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची आघाडी झाली असली तरी रायगड जिल्ह्यामधील शेतकरी कामगार पक्ष हा आमचा सहकारी पक्ष राहणार आहे.रायगड जिल्ह्यात सुरु असलेली आमची आघाडी अशीच अविरत अबाधित राहणार असून शेतकरी कामगार पक्षाला सुद्धा मुख्य प्रवाहात सामील करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी सुनील तटकरे यांनी केले आहे.  

 

अवश्य वाचा