भाकरवड 

   अलिबाग तालुक्यातील कमळ पाडा गावचे रहिवाशी लक्षुमन जनार्धन पाटील यांचे सुपुत्र  हवालदार योगेश लक्षुमन पाटील यांची शहाबाज गावच्या सरहद्दीवरून  बेंजो च्या सुमधुर आवाजात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी वंदे मातरम, भारत माते की जय,अश्या घोषणा देत सारा परिसर दुमडून गेला होता  या वेळी  शहाबाज पंचक्रोशीतील  ग्रामस्थ ,तसेंच मित्र परिवार नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होतेही मिरवणूक कमळ पाडा गावच्या शिव शभो मंदिर सभागृहात येऊन तेथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला.

   या वेळी योगेश पाटील ,पत्नी याचे आई वडील ,भाऊ  बहिन,कुटुंबातील सदस्य रिटायर हवालदार आशीर्वाद पाटील कुर्डुस, कुमार कुथे लान्स हवालदार चोले, हिराचंद्र कोठेकर हवालदार गडब ,विनायक पाटील नोवदल कुशुम्बले, कमलाकर गायकवाड हवालदार, दीनानाथ टेमकर नायक कमळ पाडा ,नितीन पाटील नायक कमळ पाडा, शेखर टेमकर नायक कमळ पाडा, वैभव पाटील हवालदार  कमळ पाडा , जितेंद्र मगर संहानगोटी नायक गनर ,मुरलीधर पाटील धामणपाडा हवालदार ,मयुरेश गावंड धोकवडे ,आनंद पाटील गोवा मुक्ती विराट नवखा ,विजय पाटील धाकटे शहापूर,पोयनाड पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक सुहास आव्हाड ,आदी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन, तसेच गणेशाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून करण्यात आली .

   या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्र गीताने घेऊन व धामण पाडा गावचे टीव्ही स्टार सचिन धुमाळ याच्या बासरी वादनाने करून उपस्थित्यांचे मने जिंकली तर 1997 च्या शहाबाज विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांनी  आमंत्रित करून सरप्राईज गिप्ट म्हणून सुप्रसिद्ध गायक रोहित पाटील यांनी देश भक्ती पर गीत सादर केले हवालदार पदावर कार्यरत असलेल्या योगेश पाटील यांनी सैन्य दलात 30 मार्च 2001रोजी ठाणे येथे भरती होऊन 19 वर्षे भारत मातेची सेवा केली. 

   नाशिक आर्ट लरी ट्रे निग सेंट्रल मद्ये 67 वीरमराठा रेजिमेंट नियुक्ती  झारखंड येथे करण्यात आली त्या नंतर जम्मू काश्मीर दमना शहर,पंजाब फिरोज पूर ,आसाम शिबसागर उत्तर प्रदेश अलाहाबाद ,तर लेह लडाख सियाचीन आदी ठिकाणी प्रथम लांस नायक,नायक, लांस हवालदार, हवालदार,अशा पदावर कार्यरत राहून देश सेवा केली पाटील यांनी शेवटी सेवानिवृत्त होताना खडतर प्रसंगात सियाचीन येथे23 दिवस मा यनस 18 डिग्री तापमान असलेल्या नक्षलवादी विभागात सेवा केलीया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्ट समालोचक राजेंद्र टेमकर यांनी केले यावेळी सर्व  उपस्थित मान्यवर मंडळीनी योगेश पाटील यांना पुष्पहार देऊन पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या तर शेवट वंदे मातरम घेऊन करण्यात आला

अवश्य वाचा