महाड-दि.१ डिसेंबर 

   किल्ले रायगड संवर्धनाचे काम योग्य वेळेंमध्ये होत असुन गडावरील शिवकाळांतील बांधकाम कश्या प्रकारचे होते ते पुर्णपणे उत्खनन केल्या शिवाय कळणार नाही,सुमारे ३५० ठिकाणचे अवशेष बाहेर काढण्याचे काम पुरातत्व विभागा कडून होणे आवश्यक आहे,त्या नंतरच जतन संवर्धन आणि मुलभुत सुविधा देण्याचे काम करता येईल.त्याच बरोबर किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या नाणे दरवाज्याची पुर्नबांधणी करणार असल्याची माहिती किल्ले रायगड प्रधिकरणाचे अध्यक्ष खा.संभाजी राजे यांनी शनिवारी पाचाड येथे आयोजित करण्यांत आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सातपुते उपस्थित होते.

   राज्य शासनाने किल्ले रायगड संवर्धना करीता ६०६ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला असल्याचे सांगताना खा.संभाजीराजे म्हणाले,या निधी पैकी आता पर्यत ५९ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे,त्यांतील रायगड प्रधिकरणाच्या स्पेशल सेल करीता २४ कोटी आणि जमीन संपादना करीता २१कोटी रुपये त्याच बरोबर पुरातत्व विभागा कडे ११ कोटी वर्ग करण्यांत आले असल्याचे सांगितले.शासनाकडे चार महिन्या पुर्वी २० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यांत आली होती,नवीन सरकार स्थापन झाल्या बरोबर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पहिल्याच बैठकीमध्ये निधी मंजुर केला,या बद्दल खा.संभाजी राजे यांनी नवीन सरकारचे आभार व्यक्त केले.

   किल्ले रायगडावरील संवर्धनाची कामे सुरु असल्याचे सांगताना खा.संभाजीराजे यांनी कामाच्या प्रगतीची माहिती दिली.चित्त दरवाज्या ते वाळसुरे खिंड,मशिद मोर्चा ते महादरवाजा पर्यतचे पायरीचे काम पुर्ण झाले असुन कठडे तयार करण्याचे काम सुरु आहे.गडावरील महादरवाजा ते टकमकटोका कडे जाणारा रस्ता आणि समाधीस्थळाचे मागिल बाजु अश्या ठिकाणी स्वच्छता गृह उभारण्यांत येणार आहेंत,त्याच बरोबर नाणे दरवाज्याची पुर्नबांधणी करण्यांत येणार असल्याचे सांगताना ते पुढे म्हणाले,दरवाज्याच्या ठिकाणी शंभर पेक्षा अधिक दगड सापडले आहेंत,त्याच बरोबर त्यावेळच्या बांधकाम करण्याची पध्दत कश्या प्रकारे होती त्याचे अवशेष आढळून आले असल्याने दरवाज्याची पुर्नबांधणी करण्याचा निर्णय घेण्यांत आला असल्याचे खा.संभाजी राजे यांनी सांगितले.या शिवाय हत्ती तलावाची गळती काढण्याचे पारंपारी काम,महादरवाजा ते शिरकाई मंंदिर पायरी मार्ग,महादरवाजा परिसरांतील तटबंदी,राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांच्या समाधी स्थळाचे सौदर्यीकरण व संवर्धन,बाजारपेठ पासुन श्री जगदीश्वर मंदिर पर्यत असलेल्या मार्गावरील वाडे,जोती यांचे संवर्धन खुबलढा बुरुजाची संवर्धन इत्यादी कामे करण्यांत येणार आहेंत.

   किल्ले रायगड संवर्धनाचे काम सुरु असताना सभोवतालच्या गावांच्या विकासा कडे देखिल लक्ष देण्यांत आले आहे.या परिसरांतील २१ गावांचा विकास होणार असुन त्यांतील ११ गावांना जोडणाNया रस्त्याची कामे पुर्ण झाली आहेंत.किल्ले रायगडकडे येणाNया महाड ते पाचाड या रस्त्याला राष्टीय महामार्गाचा दर्जा देण्यांत आला आहे.सदरचे काम नॅशनल हायवे विभागा कडून करण्यांत येत आहे परंतु  काम अतिशय संथ गतीने असल्या बद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.रस्त्याचे काम करणारे ठेकेदार एम.बी.पाटील यांच्या कडून कामा मध्ये दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करीत पुढे म्हणाले पाटील हे खासदार बी.एन.पाटील यांचे बंधु असल्याने त्यांना राजकीय आश्रय मिळाला आहे.आणि त्यामुळेच त्यांची मनमानी सुरु असल्याचे सांगताना संबधीत ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यांत यावे अशी मागणी खा.संभाजीराजे यांनी यावेळी केली.रायगड संवर्धनाचे काम योग्य वेळेंत होईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अवश्य वाचा