मुरुड जंजिरा     

   नांदगाव हायस्कूल च्या पंचक्रोशी परिसरात पाच ग्रामपंचायती येतात याच शाळेमधून माझ्यासह इतर ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी व त्यांच्या मुलांचे शिक्षण झाले आहे.उसरोली ग्रामपंचायत हद्दीत हि शाळा मोडत असून या शाळेसाठी आमचा गाव आमचा विकास या योजनेच्या १५ वा वित्त आयोगामधून शाळेच्या परिसराला तारेचे वॉल कंपाऊंड बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असून इतर हि ग्रामपंचायतीनी या शाळेसाठी योगदान द्यावे व शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे असे आव्हान उसरोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष नांदगावकर यांनी केले आहे.श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंत नगर नांदगाव येथील स्नेह संमेलन कार्यक्रमात ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

   यावेळी व्यासपीठावर सहजीवन विद्यामंडळाचे अध्यक्ष फैरोज घलटे,मुख्याध्यापक चिंतामणी जोशी,संचालक अरविंद भंडारी,गणेश गाणार,कार्याध्यक्ष विजय बनाटे,पत्रकार उदय खोत,माजी पोलीस पाटील दामोदर राऊत,माजी उपसरपंच योगेंद्र गोयजी,नांदगाव ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष प्रकाश मुंबईकर,पर्यवेक्षक उत्तमराव वाघमोडे,अस्लम हलदे,अलका घुमकर,विद्यार्थी प्रतिनिधी हर्षद पाटील,विद्यार्थी प्रतिनिधींनी प्रिया शेळके,ज्योती कांबळे,प्रतीक पेडणेकर , आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उसरोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष नांदगावकर यांचं हस्ते शिवस्मारकाच्या नूतनीकरण केलेल्या स्मारकाचे उदघाटन त्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक चिंतामणी जोशी यांनी शिवस्मारक नूतनीकरणासाठी विशेष सहकार्य केलेल्या शिक्षकांचे आभार व्यक्त केले.

   येणाऱ्या शिवजयंतीला शाळेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती  पुतळा बसवण्यात येणार असल्याचे सांगितले.सहजीवन विद्यामंडळाचे अध्यक्ष फैरोज घलटे यांनी शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात शिक्षकांचे मोठे योगदान असून मुख्याध्यापक जोशी सर बसल्यामुळे शाळेच्या विकासाची कामे झटपट पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी या शाळेचे  माजी सहशिक्षक व पत्रकार उदय खोत यांनी पुढील वर्षात शाळेला ६० वर्ष पूर्ण होत असून विशेष कार्यक्रम करण्याची सूचना दिली.यावेळी या शाळेचे स्नेह संमेलनात रेकॉर्ड डान्स व नाटिका पहाण्यासाठी पंचक्रोशीमधील हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर राऊत तर आभार गणेश ठोसर यांनी व्यक्त केले. 

अवश्य वाचा