मोहोपाडा-

   पेन्शन वाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी रायगड औद्योगिक पेन्शनर संघटनेच्या अखिल भारतीय ईपिएफ पेन्शनर संघटना राष्ट्रीय समन्वयक समितीच्या वतीने दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर देशव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.यावेली पेन्शन वाढीचा प्रस्ताव अर्थंमंत्री निर्मंला सितारामन यांच्या पुढे ठेवण्याचे आश्र्वासन कामगार मंत्र्यांच्या सचिवांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.रायगड औद्योगिक पेन्शनर संघटनेसह देशातील पेन्शनर संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्रातील पेन्शनर्सं यांनी धरणे आंदोलन करुन संघटनेच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री यांच्या सचिवांची भेट घेतली.

   यावेली सचिवांनी हिरवा कंदील दाखवत पेन्शनवाढीबद्दल आम्ही सकारात्मक आहोत.पेन्शन विक्रीची रक्कम पुनस्थापित करण्याचा निर्णय झाला असून त्याचे परीपत्रक लवकरच काढणार असल्याचे स्पष्ट केले.यावेली खासदार श्रीरंग बारणे, खासदार मोहंमद बशीर यांनी पुढाकार घेतला होता.दिल्ली येथे झालेल्या लक्षवेधी धरणे आंदोलनाला देशातील पेन्शनर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.या धरणे आंदोलनाचे नेतृत्व रायगड औद्योगिक पेन्शनर संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी बामणे,शिवाजी भोसले,एम.धर्मजन,काॅ.व्हि.एम.पतंगराव,एम.आर.जाधव, आत्माराम मोठले,काॅ.अतुल दिघे,काॅ.आनंदराव वायकर, देवराव पाटील, वसंतराव तोरडमल,बलभिम कुबडे,टि.के.कांबले,अनंत कुलकर्णी,डि.बी.जोशी यांनी केले.

 

अवश्य वाचा