पंढरपूर -
महाराष्ट्रात नव्याने तयार झालेल्या महाविकास आघाडीच्यावतीने आघाडीचे नेते शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची व आघाडीतील पक्षाच्या सहा नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ संपूर्ण राष्ट्रासमक्ष मुंबई येथील शिवतीर्थावर घेतली. त्याचा आनंदोत्सव तमाम पंढरपूरकरांच्यावतीने शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस मित्र पक्षाच्यावतीने पंढरपुरातील शिवतीर्थावर सायं.6 वाजता प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास शिवसेनेचे संजय घोडके, राष्ट्रवादीचे सुधीर भोसले व कॉंग्रेसचे राजेश भादुले यांनी पुष्पहार अर्पण केला.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जय भवानी, जय शिवाजी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उध्दवजी आगे बढो हम तुम्हारे साथ है,कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघआला, महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून नागरिकांना साखर वाटप करण्यात आली व आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सुधीर भोसले, राजेश भादुले, साधना राऊत, संगीता पवार, आरती बसवंती, चारूशिला कुलकर्णी, शोभा ननवरे, गंगा पवार, बाबासोा अभंगराव, सुनिल केंगार, सिध्दनाथ कोरे, माऊली अष्टेकर, बाळासोा देवकर, भास्कर साळुंखे, समीर कोळी, दिपक येळे, दिगंबर सुडके, दत्ता माने, शिवाजी मस्के, सुनिल डोंबे,गजानन टल्लू, संजय गवळी, पितांबर कापसे, एस.टी.शेख, दिगंबर मोरे, कैलास शिंदे, वैभव बडवे, संतोष बंडगर, विजय काळे, सचिन कदम, अंबादास मराठे, पिंटू चौधरी, अरूण कांबळे, बबन माने, बाळासोा आसबे, इरकल यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2019 कृषीवल. Maintained By Initialize Group