रोहा

   रोटरी क्लब यांच्या संकल्पनेतून रोहा तालुक्यात द्वितीय कोकण हिल चॅलेंजर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दि १५ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. धावणे हा सर्वात स्वस्त आणि चांगला व्यायाम म्हणून ओळखला जातो.आपली शारीरिक क्षमता तपासण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धेसारखे दुसरे आव्हान नाही.या स्पर्धेच्या निमित्ताने कोकणातील धावपटूंना ही सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी http://konkan bill challenger.co.in या संकेतस्थळाला भेट देऊन नाव नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.एकूण तीन गटात ही स्पर्धा होणार असून २१ किमी ,१० किमी आणि ३ किमी असे गट आहेत.

   या गटांसाठी अनुक्रमे १४००,१००० व ३५० रुपये अशी फी आकारण्यात येणार आहे.१५ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता रोहा नगरपालिका येथून स्पर्धेला सुरुवात होणार असून खारी चेक पोस्ट येथून डाव्या बाजूला वळून काजूवाडी उसर फाटा येथून वराठी गाव मार्गे कृष्णा हॉटेल ( तांबडी फाटा) व तिथून परत असा स्पर्धेचा मार्ग असणार आहे.रोहा नगरपालिका या स्पर्धेचे प्रिन्सिपल पार्टनर असून कृषिवल माध्यम प्रायोजक आहे.मागील वर्षी या स्पर्धेचे पहिले वर्ष असून देखील सुमारे एक हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या वर्षी सुमारे पंधराशे स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतील असा अंदाज आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

अवश्य वाचा