वाकण 

   फाईटर्स फाऊंडेशन सहकार्याने व रायगड जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटनेच्या वतीने खुला गटातील सिनिअर ( १९ वर्षावरिल) व सब ज्युनिअर  (१४ वर्षाखालील) गटातील मुले व मुली यांच्या रायगड जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन रविवार  दि.१ डिसेंबर रोजी जयकिसान विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज पटांगण, वडखळ, ता. पेण करण्यात आले आहे.

   महाराष्ट्र राज्य टेनिसबॉल क्रिकेट संघटना संलग्न भारतीय टेनिसबॉल क्रिकेट महासंघ व युवा कार्य, क्रीडा मंत्रालय,भारत सरकार तसेच भारतीय शालेय खेळ महासंघाची मान्यता प्राप्त असलेल्या या  टेनिसबॉल क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेतून निवडलेले खेळाडू  दि.६ ते ८ डिसेंबर रोजी अमरावती येथे होणाऱ्या ५ व्या सिनिअर व ४ थ्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याच्या संघाचे प्रतिनिधित्व करतील. नंतर राज्यस्तरीय स्पर्धेतून निवडलेले खेळाडू राष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे निवडले जातील. अधिक माहिती साठी सुधाकर म्हात्रे मो.नं. ९९८७०६५५९९, महेश म्हात्रे- ९८५०१८९९४४,विनायक म्हात्रे- ९३०९८२५२३९,नरेश म्हात्रे- ७६६६४०६७६१,संदीप गुरव ९९६०७०२५१०,
रवींद्र काणेकर -९२७३४४१८०० यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान रायगड जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटनेचे सचिव नागोठण्यातील क्रिडापटू  संदीप गुरव यांनी केले आहे.

अवश्य वाचा