राज्याच्या राजकारणात एका राञीत अनपेक्षीत घटना घडल्या आहेत. शिवसेना-राष्ट्वादी-कॉंग्रेस यांचे जुळले असे दिसत असताना अचानक सकाळच्या प्रहरी फडणवीस यांचा शपथविधी झाला व उपमुख्यमंञी म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. शरद पवारांनी माञ आपण या निर्णयाशी सहमत नसल्याचे स्पष्ट केल्याने राष्ट्वादी पक्षात व पवार घराण्यात फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. काकाच्या पाठीत पुतण्याने खंजीर खुपसला व महाराष्ट्रात 41 वर्षानंतर एक मोठा भूकंप घडवून आणला. 1978 साली 38 वर्षाचे तरुण गृहमंत्री असलेल्या शरद पवारांनी दोन्ही  कोग्रेसमधून 20-20 आमदार फोडत जनता पक्षाच्या साह्याने आपले सरकार स्थापन केले. स्व. वसंत दादा पाटील यांच्यासारख्या दिग्गजांचे सरकार त्यांनी स्व यशवंतराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने पडले होते. नंतर हेच यशवंतराव जेव्हा 1982 साली स्वगृही अर्थात इंदिरा काँग्रेस मध्ये गेले तेव्हा शरद पवारांनी त्यांना साथ दिली नाही. दोनच वर्षात चव्हाणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर अजून दोन वर्षांनी पवार स्वगृही परतले. बाळासाहेब- राज, गोपीनाथ-धनंजय आशा अनेक काका पुटण्याच्या लढाया महाराष्ट्राने पहिल्या आहेत.

   आता त्यात आणखी एका लढाईची नोंद झाली आहे. तिकडे उत्तर प्रदेशात तर अखिलेश यादव यांनी आपले  वडील मुलायम सिंह यादव यांच्या विरुद्ध बंडाचा झेंडा उभारला होता. त्यामुळे राजकारणात कुणी कोणाचे नसते हे बघायला मिळाले. इंतिहासात अशी सत्तेसाठी अनेक बंडाळी झाली आहेत आणि ती केवळ मुस्लिम सत्ताधाऱ्यातच नाही तर हिंदू, शीख धर्मियातही अशी सत्तांतरे झाली आहेत. औरंगजेबाने तर आपल्या तीन भावाना ठार मारून वडीलांना कैदेत करुन सत्ता घेतली होती. अजित पवार  हे काकांवर नाराज आहेत हे 2009ला अनेक जण उघडपणे बोलू लागले होते. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पुन्हा छगन भुजबळ यांची निवड केली होती त्यावेळी ते जाणवले देखील होते. आता शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, राष्ट्रवादी आणि काँग्रेस चे जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात उपमुख्यमंत्री असे गणित काल रात्री काकांनी मांडले तेव्हा मात्र अजित दादांचा संयम सुटला असे दिसते. आणि काकांच्या हुन जास्त वेगाने त्यांनी हालचाली करत त्यांनी सकाळी राज भवन गाठून चक्क देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने शपथ घेतली. शरद पवारांनी याला आपला पाठिंबा नसल्याचं सांगितल्याने अजितदादा नी पक्ष फोडला हे उघड आहे.  54 सदस्यांच्या राष्ट्रवादीत फुट पाडण्यासाठी 38 आमदार आवश्यक आहेत. आणि तेवढे आमदार असल्याशिवाय अजित पवार  पक्ष फोडूच शकत नाहीत. अजित दादाच्या पत्नी सुनेत्रा यांचे जवळचे नातेवाईक राणा जगजितसिंग पाटील हे आधीच भाजप मध्ये दाखल झाले आहेत.

   आपला मुलगा पार्थला उमेदवारी देताना सुद्धा अजित दादांनी पक्षावर दबाव आणला होता. त्यांच्या पराभवाने आणि त्यातच रोहित पवार यांच्या विजयाने ते अधिकच नाराज होते. ईडी प्रकरणात आमदारकीचा राजीनामा देऊन किंवा आपण बारामतीला जातो अस सांगून त्यांनी आपल्या मनातल्या घुसमटीची जाणीव करून दिली होती. अशाच प्रकारे कर्नाटकात माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या मुलाने कुमारस्वामींनी भाजपच्या साह्याने मुख्यमंत्रीपद मिळविले होतें. मात्र देवेगौडा हे आपला मुलगा आपले  ऐकत नाहीत असं सांगून हात झटकून मोकळे झाले होते. 41 वर्षांपूर्वी पवारांनी काही तासात  स्व. यशवंतराव चव्हाणांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्रीपद मिळविले. इथे अजितदादा नी एक रात्रीत काकांच्या पाठीत खंजीर खुपसून उपमुख्यमंत्रीपद मिळविले. याला कारण काका उपमुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील यांचा नाव पुढे करत आहेत याची कुणकुण अजितदादा ना होतीच. आणि म्हणूनच 60ला टेकलेल्या दादांनी भाजपचा हात धरत काकांच्या भाषेत एक  प्रकारे असंगाशी संग केला आहे. जर राष्ट्रवादी त ही फूट असेल तर हे सरकार निश्चित पाच वर्षे राहील. कारण भाजपचे 105 आणि 38 जणांचा फुटीर गट मिळून 143 संख्या होते आणि अपक्षांच्या मदतीने 145 चा जादुई आकडा गाठू शकतात.

   जर अस घडलं असेल तर हाताशी फक्त 16 आमदार उरलेल्या पवारांना आपला पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करणे क्रमप्राप्त आहे. तस झालं तरच काँग्रेसला विरोधीपक्ष म्हणून मान्यता मिळेल. या सर्व राजकारणात 30 वर्षे प्रखर ज्वलनत हिंदुत्वाचा आणि  भूमीपुत्रांचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेची अवस्था मात्र घर का ना घाटका अशी झाली आहे. जर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या नाहीत तर अजितदादांना पवारांचा आशीर्वाद नव्हता यावरही शिक्कामोर्तब होईल. एकूणच राजकारण म्हणजे केवळ सत्ता मिळवणे, त्यासाठी पक्षनिष्ठा व नातीगोतीही कधीही विसरली जाऊ शकतात. राजकारण ही लोकसेवा नव्हे तर वैयक्तिक स्वार्थ हेच या घटना राजकारणाचा बाज बदलला आहे हे सांगतात.

अवश्य वाचा